Ashish Shelar : "भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय"; आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 04:03 PM2022-11-06T16:03:11+5:302022-11-06T16:15:22+5:30
Andheri East Bypoll Election Result And BJP Ashish Shelar : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी विजयानंतर ऋतुजा लटके यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच "भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय" असंही म्हटलं आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. यानंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी विजयानंतर ऋतुजा लटके यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच "भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय" असंही म्हटलं आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाजपाच्या मदतीमुळे मा. ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय...ऋतुजाताईंचे अभिनंदन!! काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप डझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता!" असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजपाच्या मदतीमुळे मा. ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय..ऋतुजाताईंचे अभिनंदन!!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 6, 2022
काँग्रेस,राष्ट्रवादी,भाकपडझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली
भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता!
"हाती घेतली मशाल, निष्ठेचा विजय झाला विशाल; हीच मशाल धगधगणार मुंबईभर, महाराष्ट्रभर"
आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. "अंधेरी पोटनिवडणुकीतील विजय हा रमेश लटके यांच्या कार्याचा, शिवसैनिकांच्या जिद्दीचा" असं म्हटलं आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. तसेच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. "आज अंधेरी पोटनिवडणूकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे! ह्या विजयातून निर्माण झालेली ऊर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"हा विजय माझा नाही, पती रमेश लटकेंचा"; ऋतुजा लटकेंनी बोलून दाखवली खंत
"हाती घेतली मशाल, निष्ठेचा विजय झाला विशाल; हीच मशाल धगधगणार आता संपूर्ण मुंबईभर, महाराष्ट्रभर" असं ही शेअर केलेल्या व्हि़डीओमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. निवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. "हा विजय माझा नाही, पती रमेश लटकेंचा" असं म्हणत ऋतुजा यांनी मनातील खंत बोलून दाखवली. "माझ्या मनात एक खंत आहे... माझं हे दु:ख आहे की, मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागत आहे" असं म्हटलं आहे.