Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?”

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 02:16 PM2022-12-25T14:16:29+5:302022-12-25T14:17:12+5:30

Maharashtra News: संजय राऊतांनी वायफळ आणि फालतू बडबड करू नये, अशी टीका करण्यात आली आहे.

bjp atul bhatkhalkar replied sanjay raut over criticism on amruta fadnavis about statement on pm modi | Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?”

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?”

googlenewsNext

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून राजकारण तापताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे म्हटले होते. यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवे राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? अशी विचारणा केली. यावरून आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, अशी विचारणा भाजपने केली आहे.

भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. संजय राऊत यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? त्यांचे चालक, मालक, पालक ज्यांच्याकडे ते नोकरी करतात त्या उद्धव ठाकरेंनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता? संजय राऊतांनी वायफळ आणि फालतू बडबड करू नये. नाही तर पूर्वीचे दिवस येतील, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला. 

एसआयटी स्थापन झाल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे

दिशा सालियन प्रकरणाचा तपासच केला नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. तरीही या प्रकरणात सीबीआयने क्लिनचीट दिल्याचे काही लोक सांगत आहेत. त्यातून त्यांचा खरा चेहरा दिसत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन झाल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे. हे सरकार दिशा सालियनला न्याय मिळवून देईल, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांची मते त्या मांडत असतात. आता त्यांनी एक मत मांडले. आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत! अमृता फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात आणि एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अमृता फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bjp atul bhatkhalkar replied sanjay raut over criticism on amruta fadnavis about statement on pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.