Atul Bhatkhalkar : "कपटाने आलेले कपटाने गेले"; भाजपाचा जयंत पाटलांना 'त्या' विधानावरून खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 10:18 AM2022-10-13T10:18:09+5:302022-10-13T10:27:20+5:30
BJP Atul Bhatkhalkar Slams NCP Jayant Patil : कपटाने सरकार पाडण्यात आले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे केली. या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.
महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले, ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला, कोविडच्या काळात देशभरात कौतुक होईल इतके काम केले. मात्र कपटाने सरकार पाडण्यात आले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे केली. या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. "कपटाने आलेले कपटाने गेले" म्हणत खोचक टोला लगावला आहे.
भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे. "कपटाने आलेले कपटाने गेले, जयंतराव जनतेने सरकार स्थापण्यासाठी ज्यांना मतदान केले होते, ते सत्तेवर आले" असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कपटाने आलेले कपटाने गेले, जयंतराव जनतेने सरकार स्थापण्यासाठी ज्यांना मतदान केले होते, ते सत्तेवर आले. pic.twitter.com/HmhQYRvUJG
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 13, 2022
"लोकांच्या मनात संतापाची लाट"
फुटीर आमदारांच्या मतदारसंघात फिरून आल्यानंतर लोकांच्या मनात संतापाची लाट आहे असे सांगतानाच लोकं यांना धडा शिकवायला तयार आहेत. यांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती आहे. हे आमदार निवडणुकांसाठी जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा त्यांना खोक्यांचा हिशोब द्यावा लागेल असे स्पष्ट करतानाच अशा परिस्थितीत आपण आपला महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार केवळ एका वर्षाचा!
"ज्याला मुख्यमंत्री व्हायचे होते त्याला उपमुख्यमंत्री केले आणि ज्याला उपमुख्यमंत्री व्हायचे होते त्याला मुख्यमंत्री केले. त्यांचा कारभार फक्त एका वर्षाचा आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीत कमीपणा घ्यावा लागत आहे. महाविकास आघाडी सरकारने वेदांताचा प्रकल्प खेचून महाराष्ट्रात आणला होता तो प्रकल्प आज या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गुजरातला गेला. इतरही प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून इतर राज्यात जात आहेत," अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"