Atul Bhatkhalkar : "सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार, चालू द्या... तुमचाही हिशोब होईलच!"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 12:22 PM2022-06-25T12:22:02+5:302022-06-25T12:31:19+5:30
BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Sanjay Raut : आमदारांना सुरक्षा असते त्यांच्या कुटुंबीयांना नसते आणि हे तर राज्यातून पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही असं संजय राऊत म्हणाले. यावर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई - गुवाहाटीमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांनी तसं एक पत्रच ट्विट करत आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं म्हटलं आहे. याबाबत संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांना विचारण्यात आलं असता त्यांनी ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही, असं रोखठोक मत व्यक्त केलं. "बंडखोरी करुन राज्यातून पळून गेलेल्या आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही. आमदारांना सुरक्षा असते त्यांच्या कुटुंबीयांना नसते आणि हे तर राज्यातून पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही", असं संजय राऊत म्हणाले. यावर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे.
"सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार आहे. चालू द्या... तुमचाही हिशोब होईलच" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. तसेच "अहंकार, माजाच्या अतिरेकाने ज्यांना सत्ता सांभाळता आली नाही त्यांनी किमान स्वतःला सांभाळावं" असा टोला देखील लगावला आहे. भातखळकर यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये "अहंकार आणि माजाच्या अतिरेकाने ज्यांना सत्ता सांभाळता आली नाही त्यांनी आता किमान स्वतःला सांभाळावं. भाजपा नेत्यांना शहाणपणाचे सल्ले देण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये" असं म्हटलं आहे.
"देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते आहेत. मी त्यांना एकच सल्ला देईन तुम्ही आमच्या झमेल्यात पडू नका. नाहीतर पुन्हा एकदा फसाल. याआधी पहाटेच्या शपथविधीनं तुमच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचला आहे. आता पुन्हा एकदा तसं झालं तर तुमची प्रतिष्ठा धुळीस मिळेल. आमचे राजकीय मतभेद असले तरी फडणवीस आमचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी प्रतिष्ठा सांभाळावी. कारण आमच्या झमेल्यात पडलात तर फसाल", असं संजय राऊत म्हणाले यावर भाजपाने जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होणार असून या बैठकीत बंडखोरांविरोधात मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टीचा निर्णय बैठकीत घेतला जाऊ शकतो. तसंच पक्षाच्या घटनेतही काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. दुपारी १ वाजता बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे गटानं बंड पुकारल्यानंतर आज पाचव्या दिवशी राज्यात हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. काल रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक झाली. तर दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत खलबतं सुरू होती.