भाजपा बिनधास्त
By admin | Published: November 11, 2014 01:36 AM2014-11-11T01:36:29+5:302014-11-11T01:36:29+5:30
भाजपाचे राज्यातील पहिलेवहिले पण अल्पमतातील सरकार 12 तारखेला बहुमत सिद्ध करेल, अशी तजवीज झाली असल्याने त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज नाही,
Next
मुंबई : भाजपाचे राज्यातील पहिलेवहिले पण अल्पमतातील सरकार 12 तारखेला बहुमत सिद्ध करेल, अशी तजवीज झाली असल्याने त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज नाही, असे चित्र आहे. त्यामुळे सरकार टिकण्याबाबत भाजपाची कोअर कमिटी निर्धास्त दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेह:यावर आज कुठलेही टेन्शन नव्हते.
स्वत:चे 121 आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 असे भाजपाचे 122चे संख्याबळ आहे. बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. याशिवाय 7 अपक्ष आमदारही भाजपाच्या तंबूत दाखल झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या 3 आमदारांनी मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे.
याशिवाय भारिप-बहुजन महासंघ, कम्युनिस्ट पक्ष आणि
मनसेचे प्रत्येकी एकेक आमदार भाजपाला मतदान करणार नाहीत पण किमान अनुपस्थित राहतील, असा प्रय} शेवटच्या टप्प्यात आहे. शिवसेनेने पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली तर राष्ट्रवादीचा पाठिंबा तयार आहे.
राष्ट्रवादीच्या 41 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले तर 288 सदस्यांच्या सभागृहात सरकारचे संख्याबळ 178 होईल आणि विश्वासदर्शक ठराव जिंकता येईल.
राष्ट्रवादीने अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला तर 247 सदस्यांमध्ये 138 संख्याबळाच्या आधारे (उपस्थित, अनुपस्थित सदस्यांसह) भाजपा सरकार टिकवू शकेल. एमआयएमच्या दोन आणि सपाच्या एका सदस्याचा पाठिंबा भाजपा मागणार नाही.
काही आमदारांची अनुपस्थिती
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस, शिवसेनेच्या काही आमदारांनी अनुपस्थित राहावे यासाठी भाजपाकडून प्रय} केले जात आहेत. या आमदारांचे सदस्यत्व जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. समजा सदस्यत्व गेलेच तर त्यांना भाजपाच्या तिकिटावर निवडून आणण्याची रणनीतीही आखली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रंनी दिली.