“सीतामाईलाही भोग चुकलेले नाहीत, आपण तर...”; नवनीत राणांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 03:10 PM2024-04-19T15:10:09+5:302024-04-19T15:10:35+5:30
Navneet Rana Replied Sanjay Raut: माझ्यासोबत अमरवातीतील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान, सन्मान जोडला गेला आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
Navneet Rana Replied Sanjay Raut: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका सभेत बोलताना भाजपाच्या अमरावतीच्या खासदार नवनीत यांच्याबाबत अपशब्द काढले. भाजपा आणि नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. मात्र, या टीकेला नवनीत राणा यांच्याकडून जशास तसे उत्तर देण्यात आले. सीतामाईला भोग भोगावे लागले होते. आपण तर राजकारणात आहोत, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मातोश्री विषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे कर्तव्य समजून कामाला लागा. बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश समजून ताकदीने कामाला लागा. विकासाचे पोरगे तुम्हाला झाले नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचे नाही. आपला उमेदवार बलवंत वानखेडे आहे. रात्र वैऱ्याची आहे. रात्रीस खेळ चाले, या शब्दांत संजय राऊतांनी टीका केली होती. यावर नवनीत राणा यांनी पलटवार केला.
नवनीत राणांसोबत अमरवातीतील महिलेचा स्वाभिमान, सन्मान जोडला आहे
कोण आहे संजय राऊत? सीतेला पण भोग चुकले नाही. आपण तर राजकारणात आहे. संजय राऊतांनी बोलताना ज्या मुलीचे कन्यादान केले आणि ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला तिच्याकडे पाहायला हवे होते. माझ्यावर टीका करण्याअगोदर आपल्या पत्नीकडे तरी एकदा पाहायचे होते. एखादी महिला जर बाहेर येऊन काम करते तर ती तिचा स्वाभिमान विकत नाही. अमरावतीची तर सून आहे. नवनीत राणांसोबत अमरवातीतील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान, सन्मान जोडला गेला आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत अमरावतीला येऊन गेला अतिशय खालच्या पातळीवर नवनीत राणांवर टीका केली. जनाब संजय राऊत, अमरावतीला येऊन नवनीत राणांना गाडण्याची भाषा केली. एक लक्षात ठेवा. ही अमरावती आहे. या अमरावतीत तुमच्यासारखे ५६ गाडण्याची ताकद आहे. नवनीत राणाविरोधात ज्या भाषेत टीका केली. १४ दिवस जेलमध्ये ठेवून समाधान झाले नाही. परत तुम्ही अमरावतीला येऊन अशी भाषा बोलता, असा पलटवार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी दिले.