राष्ट्रपतीपदी भाजपाचाच उमेदवार -महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
By admin | Published: July 6, 2017 01:24 PM2017-07-06T13:24:58+5:302017-07-06T14:02:58+5:30
स्वातंत्र्य सैनिक स्व.चंद्रकांत मेंडकी मार्गाचे जळगावात नामकरण
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.6 - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे विजयी होतील. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी होणा:या उपराष्ट्रपतीपदीही स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराची निवड होईल. भाजपाचे बहुमत असल्याने सर्वत्र भाजपाच डंका असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात 6 जुलै रोजी केले.
स्वातंत्र्य सैनिक स्व.चंद्रकांत मेंडकी मार्गाच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत डीपीडीसीची बैठक
गुरुवारी दुपारी 12.30 वाजेपासून जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेला सुरुवात झाली. सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह आमदार व खासदार यांची प्रमुख उपस्थिती आहे.