“संजय राऊत अमेरिका, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 05:36 PM2021-04-15T17:36:08+5:302021-04-15T17:39:44+5:30
belgaum bypoll: देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह पंढरपूर, बेळगाव पोटनिवडणुकीची रणधुमाळी असल्याचे पाहायला मिळत आहे.
पंढरपूर: देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह पंढरपूर, बेळगाव पोटनिवडणुकीची रणधुमाळी असल्याचे पाहायला मिळत आहे. पंढरपूरची पोटनिवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची मानली जात असून, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बेळगाव पोटनिवडणुकीसाठी मोठी सभा घेतली. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, भाजपनो संजय राऊत यांना टोला लगावला आहे. (chandrakant patil criticizes sanjay raut over belgaum bypoll campaign)
बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नये, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. यानंतर भाजप केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली असून, संजय राऊत अमेरिका, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात, असा चिमटा पाटील यांनी काढला आहे.
“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय”
नितीन गडकरींनाही सल्ला देऊ शकतात
संजय राऊत यांना अमेरिका, इंग्लंड, बेळगांव यांची माहिती असते. आम्ही सामान्य माणसं आहोत. संजय राऊत नितीन गडकरी यांनाही सल्ला देऊ शकतात, असा टोलाही पाटील यांना लगावला. नितीन गडकरी यांचा दौरा रद्द झाला असला, तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बेळगावात प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
जयंत पाटील यांचे स्वप्नरंजन
जयंत पाटील यांचे स्वप्नरंजन आहे. अठरा महिने झाले, ते सांगत आहेत की आमच्याकडून गेलेले परत येणार आहेत, परत येणार आहेत. दिवसा स्वप्नं पाहायला कुणाला अडचण नसते. मात्र भाजप पूर्वीपेक्षाही जबरदस्त होत चाललेली आहे. सामान्य लोकांना माहिती आहे, की कुठल्याही क्षणी सरकार जाऊ शकतं, अशा दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. दिवा विझण्यापूर्वी जास्त मोठा होतो, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होताना दिसत आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.