“सत्तेच्या गैरवापराबाबत सुप्रिया सुळे यांनी वडिलांना विचारावं”; चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 06:38 PM2021-08-31T18:38:28+5:302021-08-31T18:41:54+5:30
सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नागपूर: महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू झाल्यापासून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका करण्यात येत आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने नोटीस बजावत छापा टाकल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (bjp chandrakant patil replied ncp supriya sule over ed action criticism)
“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
नारायण राणे यांच्या जामीन व अटकनाट्यामुळे भाजपने शिवसेनेसह सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर भाजपने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याची टीका करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. ते नागपुरात बोलत होते.
“लाखों वर्षांपासूनची सनातन धर्माची परंपरा खंडित होऊ देणार नाही”; भाजपची ठाम भूमिका
सत्तेच्या गैरवापराबाबत सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारावे
महाविकासआघाडी सरकारमधील लोकांना ईडीचा फायदा होणार असेल वाटत असेल, तर त्यांनी पेढे वाटावे. सुप्रिया सुळे यांना असे वाटत असेल की, सत्तेचा गैरवापर या आधी इतका कधीच झाला नाही तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारा की इंदिरा गांधी यांनी सत्तेचा गैरवापर कसा केला, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला.
“शिवसेनेची टीम लूटमार करतेय, ही आहे ठाकरे सरकारची ‘महान’ ११”; भाजपचे टीकास्त्र
त्यामुळे त्यांना याची दखल घ्यावी लागली
शिवसेना ही हिंदुत्ववादी होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिलेली नाही. असे असते, तर त्यांनी टिपू सुलतान जयंती साजरी केली नसती. मुख्यमंत्री जनआशीर्वाद यात्रेवर काहीही बोलू शकतात. कोकणात जनआशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांना याची दखल घ्यावी लागली, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
ED नोटिसीनंतर धावाधाव! अनिल परब घाईघाईत संजय राऊतांच्या भेटीला; १० मिनिटांत माघारी
दरम्यान, आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असे कधीच पाहिले नाही. कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलवले जाते. ही कुठली संस्कृती आहे, अशी विचारणा करत, ते काय विचार करतात हे सांगू शकत नाही. मात्र, हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असे पाहिले नाही, हे दुर्दैवी आहे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला होता.