"मग तुम्ही सरकारमध्ये झोपा काढताय का?"; ओबीसी आरक्षण मुद्द्यावर भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 08:02 PM2022-06-14T20:02:42+5:302022-06-14T20:03:24+5:30

भाजपाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआ सरकारला केले अनेक सवाल

BJP Chandrashekhar Bawankule attackingly slams Mahavikas Aghadi Ministers Chaggan Bhujbal Vijay Wadettiwar over OBC Reservation | "मग तुम्ही सरकारमध्ये झोपा काढताय का?"; ओबीसी आरक्षण मुद्द्यावर भाजपा आक्रमक

"मग तुम्ही सरकारमध्ये झोपा काढताय का?"; ओबीसी आरक्षण मुद्द्यावर भाजपा आक्रमक

googlenewsNext

BJP Chandrashekhar Bawankule OBC Reservation | ओबीसी  समाजाच्या बाबतीत गेल्या तीन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार टाइमपास करीत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे इम्पिरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने तयार केला जातोय, हे राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी सोमवारी कबूल केले. असे असेल तर मग तुम्ही सरकारमध्ये बसून काय करत आहात? तुम्ही झोपा काढत आहात का?, असा संतप्त सवाल आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला विचारला.

"सरकार झोपा काढत आहे का? आयोग तुमच्या अधिकारात काम करत आहे, मग चुका कशा होतात? तुम्हीच आयोगाला चुका करायला सांगता, त्यांना टाइमपास करायला सांगता, महाराष्ट्रात दौरे करायला सांगता. दौरे करण्याची गरज नव्हती. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला, त्याच दिवशी इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू व्हायला पाहिजे होते. आता लोकांच्या आडनावावरून जात लिहिली जात आहे आणि उद्या कुणी आक्षेप घेतला की, तो डेटा खराब होईल, कामी येणार नाही. त्यामुळे आडनावावरून डेटा तयार करण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे", असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात नमूद केले.

"सर्वोच्च न्यायालयात हे सरकार पुन्हा लाथडलं जाईल आणि विना आरक्षणाच्या निवडणुका घेतल्या जातील, अशी भिती आता निर्माण झाली आहे. विना ओबीसी निवडणुका घेण्याचे मनसुबे या सरकारने आखले आहेत. त्यामुळेच जाणीवपूर्वक चुकीचा आणि खोटा डेटा न्यायालयाला सादर करण्याचे यांचे प्रयत्न चाललेले आहेत. पुन्हा टाइमपास करून याही निवडणुका पार पाडतील, हेच यांचे ठरलेले आहे. ओबीसींना आरक्षण द्यायचेच नाही, असेच या सरकारने ठरवलेले आहे", असेही आमदार बावनकुळे म्हणाले.

"आरक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या पण ओबीसी आयोगाने त्याकडे लक्ष न देता केवळ दौरे करण्याचे काम केले. खरं तर दौरे करण्याचे कामच नव्हते. नियमांप्रमाणे डेटा तयार करायचा होता. जसा मध्यप्रदेश सरकारने केला, तसाच तो करायचा होता. पण तीन वर्षांपासून केवळ टाइमपास केला आणि आताही करत आहेत. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धोका निर्माण झाला", असेही आमदार बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: BJP Chandrashekhar Bawankule attackingly slams Mahavikas Aghadi Ministers Chaggan Bhujbal Vijay Wadettiwar over OBC Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.