Maharashtra Political Crisis: “PM नरेंद्र मोदी खूप मोठे नेते, शरद पवारांनी नादी लागू नये”; चंद्रशेखर बावनकुळेंचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 10:31 PM2022-09-07T22:31:54+5:302022-09-07T22:33:39+5:30

Maharashtra Political Crisis: PM नरेंद्र मोदींना भेटल्यावर एखाद्या महापुरुषाला भेटल्यासारखे वाटते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

bjp chandrashekhar bawankule reaction over ncp chief sharad pawar and bihar cm nitish kumar | Maharashtra Political Crisis: “PM नरेंद्र मोदी खूप मोठे नेते, शरद पवारांनी नादी लागू नये”; चंद्रशेखर बावनकुळेंचा एल्गार

Maharashtra Political Crisis: “PM नरेंद्र मोदी खूप मोठे नेते, शरद पवारांनी नादी लागू नये”; चंद्रशेखर बावनकुळेंचा एल्गार

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, मागील वेळेस थोडक्यासाठी पराभव पत्कराव्या लागलेल्या देशभरातील अनेक मतदारसंघावर भर देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री कामाला लागले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीचाही समावेश असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मोठे नेते आहेत. शरद पवार यांनी त्यांच्या नादी लागू नये, असा थेट इशारा भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे. 

शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या कितीही भेटी होऊ द्या. काही फरक पडत नाही. तिसरी, चौथी, पाचवी कुठलीही आघाडी केली तरी ती आघाडी त्यांना लखलाभ असो. मोदीजींचे कर्तृत्व आणि नेतृत्व खूप मोठे आहे. त्यांना १५० देशांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. मोदींना जग विश्वगुरू म्हणून बघते. अशा नेत्याची तुम्ही बरोबरी करू शकत नाहीत. ज्यांचे दहाच्यावर खासदार निवडून येत नाहीत, ज्यांचे साठच्यावर आमदार निवडून येत नाहीत. ते दिवसा स्वप्न बघायला लागले आहेत. शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये. मोदी हे खूप मोठे नेते आहेत, असा एल्गार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते मीडियाशी बोलत होते.

आम्ही दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देणार

नितीश कुमार यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीची कृपा आहे. नितीश कुमार यांनी दगाबाजी केली. इकडे उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली. तिकडे त्यांनी केली. आम्ही दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देणार, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील दोनशेच्यावर आमदार आम्ही निवडून आणणार. महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही, असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 

दरम्यान, पंतप्रधान मोदीजींना सहपरिवार भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला २२ मिनिटे वेळ देत माझ्यासोबत आपुलकीने संवाद साधला. ती माझ्यासाठी आयुष्यभराची पुंजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यावर एखाद्या महापुरुषाला भेटल्यासारखे वाटते. हे मी अनुभवले आहे. भाजपच्या नेतृत्वाने समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचवण्याचे काम केले. पक्षाच्या त्या खुर्चीवर बसण्याचा मान दिला. पक्षाचा आभारी आहे. माझ्यावर सगळ्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. ती जबाबदारी पार पडणार, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
 

Web Title: bjp chandrashekhar bawankule reaction over ncp chief sharad pawar and bihar cm nitish kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.