Maharashtra Politics: “अनिल देशमुखांनी बोलताना थोडा संयम ठेवावा, मी बोललो तर पाय आणखी खोलात जाईल”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:49 PM2023-02-14T16:49:38+5:302023-02-14T16:52:05+5:30

Maharashtra News: आम्हाला अनिल देशमुखांची काहीच गरज नव्हती. पण त्यांना भाजपची काय गरज होती ते वेळ आल्यावर सांगू, असा इशारा देण्यात आला आहे.

bjp chandrashekhar bawankule replied ncp leader anil deshmukh claims about bjp offer | Maharashtra Politics: “अनिल देशमुखांनी बोलताना थोडा संयम ठेवावा, मी बोललो तर पाय आणखी खोलात जाईल”

Maharashtra Politics: “अनिल देशमुखांनी बोलताना थोडा संयम ठेवावा, मी बोललो तर पाय आणखी खोलात जाईल”

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्यातील राजकारणात विविध मुद्द्यांवरून दावे-प्रतिदावे केले जात आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी, भाजपने पक्षात येण्याची ऑफर दिली होती. ही ऑफर घेतली असती तर महाविकास आघाडी सरकार कधीच पडले असते, असे दावा करण्यात आला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेअनिल देशमुख यांच्यावर पलटवार केला आहे. 

अनिल देशमुखांनी बोलताना थोडा संयम ठेवावा. न्यायालयाने त्यांना केवळ जामीन दिला आहे. क्लीन चीट दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक आणि संयमाने बोलावे. मी त्यांना विनंती करेन की, त्यांना कोर्टाने जामीन देताना सांगितलेल्या अटी आणि शर्थींचे त्यांनी पालन करावे. ते भाजपवर टीका करतील, चुकीचे बोलतील तर आम्हालाही उत्तर द्यावे लागेल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. 

मी तोंड उघडले तर देशमुखांना काही उत्तर देता येणार नाही

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात काय झाले होते, ते जर मी बोललो तर देशमुख अडचणीत येतील. त्यांचे पाय आणखी खोलात जातील. बावनकुळे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते म्हणाले की, अनिल देशमुख हे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. ते काही निर्दोष सिद्ध झाले नाहीत, असे सूचक विधान बावनकुळे यांनी केले. तसेच आम्हाला अनिल देशमुखांची काहीच गरज नव्हती. पण अनिल देशमुखांना भाजपची काय गरज होती ते आम्ही वेळ आल्यावर सांगू, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

दरम्यान, अनिल देशमुख यांना तुरुंगात जाण्याआधी भाजपाकडून पक्षप्रवेशाची ऑफर होती. या देशमुखांच्या दाव्याला राष्ट्रवाधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुजोरा दिला. भाजपकडून अनिल देशमुखांना सांगितले जात होते की, तुम्ही तुम्ही पक्ष बदला, विचार बदला आणि नेतृत्त्व बदला. परंतु देशमुख यांनी तुरुंगात जाण्याची तयारी दाखवली आणि पक्षाची साथ सोडणार नाही हे देखील ठणकावले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bjp chandrashekhar bawankule replied ncp leader anil deshmukh claims about bjp offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.