“सात जन्म झाले तरी ठाकरे हे फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत”: चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 03:27 PM2024-01-13T15:27:29+5:302024-01-13T15:30:30+5:30

BJP Vs Thackeray Group: उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस समजलेच नाहीत. ठाकरे फोटोग्राफी करायचे तेव्हा फडणवीस कारसेवक होते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

bjp chandrashekhar bawankule replied uddhav thackeray over criticism on dcm devendra fadnavis | “सात जन्म झाले तरी ठाकरे हे फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत”: चंद्रशेखर बावनकुळे

“सात जन्म झाले तरी ठाकरे हे फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत”: चंद्रशेखर बावनकुळे

BJP Vs Thackeray Group: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक तसेच नवी मुंबई दौरा यांवरून ठाकरे गट भाजपा आणि शिंदे गटावर टीका करताना दिसत आहे. शिंदे गट आणि भाजपाही ठाकरे गटाला प्रत्युत्तर देत आहे. यातच सात जन्म झाले तरी ठाकरे हे फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत, या शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली. याला प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस समजलेच नाहीत. गेली सुमारे ३२ ते ३५ वर्ष देवेंद्र फडणवीस यांना ओळखतो. त्यांच्या सोबत काम करत आहे. राज्याला क्रमांक एकवर आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जीवाचे रान केले. उद्धवजी फोटोग्राफी करायचे, तेव्हा देवेंद्र फडणवीस कारसेवक होते, सात जन्म झाले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकणार नाहीत, असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनीक केला. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाबरी पाडली होते, तेव्हा फडणवीसांचे वय काय होते? असा सवाल ठाकरेंनी केला होता. मीडियाशी बोलताना बावनकुळे यांनी याला उत्तर दिले. 

उद्धव ठाकरे मीडियासमोर येऊन नॅरेटीव्ह सेट करतात

उद्धव ठाकरे यांनी चित्रफीत नीट पाहिली नाही. अटल सेतूचे लोकार्पण करताना सर्वत्र बॅनरवर, जाहिरातीत अटलजींचा फोटो होता. मी नेहमीच म्हणतो उद्धव ठाकरे मीडियासमोर येऊन नॅरेटीव्ह सेट करतात. मोदी यांना जगातला सर्वोत्तम नेता असे जग म्हणते. पण मोदी यांना महान म्हणायचे फक्त पाकिस्तान आणि उद्धव ठाकरेच राहिले आहेत, असा खोचक टोला बावनकुळे यांनी लगावला. तसेच काळाराम मंदिरात पूजा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्तीचा २२ जानेवारी हा दिवस आहे. बाळासाहेब जर वरुन बघत असतील, तर माझा उद्धव अयोध्येत का जात नाही. कशाची अॅलर्जी माझ्या उद्धवला झाली आहे, असे बोलतील, अशी खोचक टीकाही बावनकुळे यांनी केली. 

दरम्यान, स्टॅलिनचा मुलगा म्हटला होता की, हिंदू धर्म संपवू. अशा सोबत उद्धवजी राहतात. मोदीजी किती घरंदाज आहेत, हे २०२४ ला दिसेल. उरणमध्ये ९० हजार महिला मोदींना नमस्कार करायला आल्या होत्या. मोदीजीच्या वादळात महाविकास आघाडी झाड-पत्यांसारखी उडून जाईल, या शब्दांत बावनकुळे यांनी निशाणा साधला.


 

Web Title: bjp chandrashekhar bawankule replied uddhav thackeray over criticism on dcm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.