"बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी आम्ही उभे, उद्धव ठाकरेंनी..."; भाजपा नेत्याचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:44 IST2024-12-13T14:43:29+5:302024-12-13T14:44:14+5:30
BJP Chandrashekhar Bawankule And Uddhav Thackeray : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानावर पलटवार केला आहे.

"बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी आम्ही उभे, उद्धव ठाकरेंनी..."; भाजपा नेत्याचा पलटवार
उद्धव ठाकरे यांनी "बांगलादेशात जे हिंदूवर अत्याचार होतायेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पावलं उचलायला हवीत. जिथे अत्याचार होताहेत तिथे धमक दाखवण्याची गरज आहे. आमच्या खासदारांनी मोदींना भेटीची वेळ मागितली होती परंतु ती नाकारली गेली. पंतप्रधान खूप व्यस्त आहेत. त्यामुळे कदाचित बांगलादेशातीलहिंदूवरील अत्याचार त्यांच्या निदर्शनात आले नसतील" असं म्हणत निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपा नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजपा उभी आहे. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर ती आमची श्रध्दा, प्राण आणि श्वास आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 13, 2024
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानावर पलटवार केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली."
"बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजपा उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारनं 'नागरिकत्व दुरूस्ती विधेयक' मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती. भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर ती आमची श्रध्दा, प्राण आणि श्वास आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले."
"राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेली टीका तसेच कर्नाटक विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा काँग्रेस नेते उद्दामपणा करतानाही तुम्ही अवाक्षर काढले नाही, यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते. तुम्हाला पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.