Sarpanch Election Maharashtra: फडणवीस सरकारच्या काळातील 'तो' निर्णय पुन्हा लागू करा; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 05:17 PM2022-07-13T17:17:59+5:302022-07-13T17:23:47+5:30

कारभाराला स्थिरता येण्यासाठी पत्राद्वारे ही विशेष मागणी करण्यात आली आहे

BJP Chandrashekhar Bawankule special demand to CM Eknath Shinde about Sarpanch Election in Maharashtra Devendra Fadnavis | Sarpanch Election Maharashtra: फडणवीस सरकारच्या काळातील 'तो' निर्णय पुन्हा लागू करा; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

Sarpanch Election Maharashtra: फडणवीस सरकारच्या काळातील 'तो' निर्णय पुन्हा लागू करा; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

googlenewsNext

Sarpanch Election Maharashtra: राज्यातील सरपंचांची निवडणूक २०१७ मध्ये फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे थेट जनतेतूनच करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या संदर्भात आ.बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर केले. या निवेदनात आ. बावनकुळे यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१७ मध्ये सरपंचाची निवड जनतेतूनच करावी असा निर्णय घेतला, मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलून सरपंचाची निवडणूक ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला. पण आता सरपंचाची निवडणूक थेट जनतेतूनच करण्याबाबत भाजपाकडून मागणी करण्यात आली आहे.

२०१७ पूर्वी सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमार्फतच होत होती. पण वारंवार अविश्वास ठराव मांडण्याच्या खेळामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळे निर्माण होत होते. अविश्वास ठराव आणला गेल्यानंतर घोडेबाजाराला ऊत येत असे. ही परिस्थिती टाळण्यासाठी व ग्रामपंचायत कारभाराला स्थिरता येण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने सरपंचाची निवड जनतेतून करण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. या शिफारशीनुसार २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सरपंच निवड जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने बदलला. राज्य सरपंच संघटनेनेही सरपंचाची निवड निर्वाचित सदस्यांमार्फत करण्यास विरोध दर्शवला होता. आता नवीन सरकारने फडणवीस सरकारचाच निर्णय कायम ठेवावा असे आ. बावनकुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Web Title: BJP Chandrashekhar Bawankule special demand to CM Eknath Shinde about Sarpanch Election in Maharashtra Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.