Rajya Sabha Election 2022 : "करेक्ट कार्यक्रम… अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर"; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 10:04 AM2022-06-11T10:04:09+5:302022-06-11T10:17:11+5:30

BJP Chitra Wagh Slams Thackeray Government : महाविकास आघाडी सरकारमधील नेते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना नेहमी "अकेला देवेंद्र क्या करेगा" असं म्हणायचे. याला आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं.

BJP Chitra Kishor Wagh Slams Thackeray Government Over Devendra Fadnavis | Rajya Sabha Election 2022 : "करेक्ट कार्यक्रम… अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर"; भाजपाचा खोचक टोला

Rajya Sabha Election 2022 : "करेक्ट कार्यक्रम… अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर"; भाजपाचा खोचक टोला

googlenewsNext

मुंबई - राज्यसभा निवडणुकीत मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. भाजपला महाविकास आघाडीची ९ मतं मिळवण्यात यश आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे. यानंतर आता भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

महाविकास आघाडी सरकारमधील नेते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना नेहमी "अकेला देवेंद्र क्या करेगा" असं म्हणायचे. याला आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. करेक्ट कार्यक्रम म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "करेक्ट कार्यक्रम…. अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर" असं वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"भाजपाचे तीन ही उमेदवार राज्यसभेवर… पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक विजयी... देवेंद्र फडणवीस यांचा चमत्कार… सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन" असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या १०६ मतांशिवाय त्यांना अधिकची मतं १७ मिळवण्यात यश आलं आहे. दुसरीकडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक ही केवळ लढविण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविली होती, जय महाराष्ट्र, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी (दि.१०) मतदान झाले. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले. तर सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला.

 

Web Title: BJP Chitra Kishor Wagh Slams Thackeray Government Over Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.