Chitra Wagh : "काय ती शायरी, काय ती अदाकारी, काय ती गुर्मी... वाट्टोळं एकदम ओके"; भाजपाचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:22 PM2022-07-05T15:22:56+5:302022-07-05T15:36:56+5:30

BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे.

BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut And BMC | Chitra Wagh : "काय ती शायरी, काय ती अदाकारी, काय ती गुर्मी... वाट्टोळं एकदम ओके"; भाजपाचा संजय राऊतांना टोला

Chitra Wagh : "काय ती शायरी, काय ती अदाकारी, काय ती गुर्मी... वाट्टोळं एकदम ओके"; भाजपाचा संजय राऊतांना टोला

googlenewsNext

मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. याच दरम्यान भाजपाने संजय राऊतांना सणसणीत टोला लगावला आहे.  

शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून "रुकने वाला वजह धूंडता हैं... और जाने वाले बहाने... राहत.." असं ट्विट केलं होतं. यावरून आता भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. "काय ती शायरी, काय ती अदाकारी, काय ती गुर्मी... वाट्टोळं एकदम ओके" असं म्हणत टीका केली आहे. तसेच मुंबईतील पावसावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

"नालेसफाईच्या ऐवजी महापालिकेची तिजोरी सफाई झाली, जनता हिशोब करणारच…" 

"दोन दिवसाच्या पावसाने मुंबईची अक्षरशः तुंबई झाली आहे. शिवसेना प्रणित मुंबई महानगरपालिकेने कोट्यावधी खर्च करून केलेली नालेसफाई, पाणी उपसा करण्यासाठी लावलेले पंप या पावसात वाहून गेले आहेत. नालेसफाईच्या ऐवजी महापालिकेची तिजोरी सफाई झाली. पंप लावून टक्केवारीचा उपसा केला.... जनता हिशोब करणारच…" असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. त्याचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेलाही पावसाचा फटका बसला आहे. 

"नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं"

 भाजपाने शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. "नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले , मुंबईला तुंबवून दाखवलं" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं... आता शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेतून देखील तोंड काळे करण्याची तयारी ठेवावी..." असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: BJP Chitra Wagh Slams Shivsena Sanjay Raut And BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.