Chitra Wagh : "पदे वाटताना माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या जीवाला राजकारणात ओढतात"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 01:04 PM2022-10-07T13:04:54+5:302022-10-07T13:13:43+5:30
BJP Chitra Wagh Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Uddhav Thackeray) यांच्या कुटुंबियांवर बोचरी टीका केली. ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं. 'बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. अशी टीका ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या कुटुंबियांवर केली होती. यावरून याता भाजपाने उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "पदे वाटताना माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे दीड वर्षांच्या जीवाला राजकारणात ओढतात" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच राजकारण इतक्या खालच्या स्तरावर याआधी कधीही गेलं नव्हतं आणि ज्यांनी नेलं त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे असंही म्हटलं आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "शिवसैनिक सोडून स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून स्वतःकडेच पक्षाध्यक्षपद, शिवसैनिक सोडून मुलासाठी मंत्रिपद, एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच संपादकपद."
शिवसैनिक सोडून स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद,
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 7, 2022
मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून स्वतःकडेच पक्षाध्यक्षपद
शिवसैनिक सोडून मुलासाठी मंत्रिपद
एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच संपादकपद
पदे वाटताना‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात pic.twitter.com/YuBYph0PpR
"पदे वाटताना माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात. हे करत असताना त्याच्या आईच्या मनाची जराही कल्पना केली नाही की तिला काय वाटलं असेल. शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात. राजकारण इतक्या खालच्या स्तरावर याआधी कधीही गेलं नव्हतं आणि ज्यांनी नेलं त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"एक दुखावलेला बाप हात जोडून सांगतोय...", श्रीकांत शिंदेंचं ठाकरेंना पत्र
"तुम्ही माझ्या दीड वर्षाच्या नातवाला राजकारणात ओढत आहात. तुम्हाला सांगतो ज्या दिवशी त्याचा जन्म झाला तेव्हाच तुमचे पतन सुरू झाले" असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले. यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. एक दुखावलेला बाप... म्हणत श्रीकांत शिंदेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का?" असा सवाल ही विचारला आहे.
"एका दीड वर्षाच्या अजाण बाळाला आपल्या भाषणात खेचणं तुमच्या धगधगत्या हिंदुत्वात बसतं का?"#ShrikantShinde#UddhavThackerayhttps://t.co/kPPHgR5qvq
— Lokmat (@lokmat) October 6, 2022
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"