Chitra Wagh : "समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो"; चित्रा वाघ यांचा उर्फीवरून सुषमा अंधारेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 01:01 PM2023-01-03T13:01:32+5:302023-01-03T13:07:41+5:30

BJP Chitra Wagh Slams Sushma Andhare : "स्री शिक्षित व्हावी, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा लेकी अभिप्रेत होत्या का?" असा सवालही विचारला आहे.

BJP Chitra Wagh Slams Sushma Andhare Over Uorfi Javed | Chitra Wagh : "समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो"; चित्रा वाघ यांचा उर्फीवरून सुषमा अंधारेंना खोचक टोला

Chitra Wagh : "समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो"; चित्रा वाघ यांचा उर्फीवरून सुषमा अंधारेंना खोचक टोला

googlenewsNext

उर्फी जावेद (Uorfi Javed) केवळ एकाच कारणाने चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करून उर्फी जावेदला बेड्या घालण्याची मागणी केली होती. यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना सवाल केले आहेत. त्यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्टही शेअर केली. याच दरम्यान आता चित्रा वाघ यांनी उर्फीवरून सुषमा अंधारेंना (Sushma Andhare) खोचक टोला लगावला आहे. 

"व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच, समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एवढी सदिच्छा आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "स्री शिक्षित व्हावी, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा लेकी अभिप्रेत होत्या का?" असा सवालही विचारला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं असून सुषमा अंधारेंवर हल्लाबोल केला आहे. "जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का?" असंही म्हटलं आहे. 

"आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे…तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का?"

"लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का? स्री शिक्षित व्हावी, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा लेकी अभिप्रेत होत्या का? जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का? माझं आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या. छत्रपतींचा आदर्श,सावित्रीचे संस्कार जपू या... खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या..." असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

"हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे,ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का? व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच. समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे" असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच सामाजिक भान आणि स्वैराचाराला विरोध हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: BJP Chitra Wagh Slams Sushma Andhare Over Uorfi Javed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.