Chitra Wagh : "कुटुंब प्रमुखाचा टेंभा मिरवला म्हणून कुणी कुटुंब प्रमुख होत नसतो"; उद्धव ठाकरेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 05:26 PM2023-07-10T17:26:58+5:302023-07-10T17:36:23+5:30
BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी "काही बोगस लोक म्हणताहेत मी मतांची भीक मागायला आलोय. मी मतांची भीकच मागतो, बोगस उद्योग करत नाही" असं म्हणत भाजपावर टीकास्त्र सोडलं. ते अमरावती येथे आयोजित सभेत बोलत होते. मी घरी बसलो पण मी घरफोडी केली नाही. तुम्ही घरफोडे आहात. मी घरी बसलो होतो, तरी सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. मला कितीही काहीही म्हणा की मी घरी बसून काम केलं. मी घरी बसून जे काम केलं ते तुम्हाला घरं फोडूनही करता येत नाही अशी टीकाही ठाकरे यांनी केली. याला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.
"केवळ कुटुंब प्रमुखाचा टेंभा मिरवला म्हणून कुणी कुटुंब प्रमुख होत नसतो" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच "उद्धव ठाकरेजी त्यासाठी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागते. जनता तर दूरच… तुम्हाला स्वतःचा पक्षही सांभाळता आला नाही, हीच वस्तूस्थिती" असं म्हणत हल्लाबोल देखील केला. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
शासन आपल्या दारी म्हणत शिंदे - फडणवीसांचं सरकार प्रत्येक घराघरात पोहचतयं… कारण आम्ही जनतेतलेच एक आहोत… जनता हेच आमचे कुटुंब आहे नि जनतेची सेवा हीच सरकारची प्राथमिकता आहे.
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 10, 2023
केवळ कुटुंब प्रमुखाचा टेंभा मिरवला म्हणून कुणी कुटुंब प्रमुख होत नसतो…@uddhavthackeray जी त्यासाठी…
"शासन आपल्या दारी म्हणत शिंदे - फडणवीसांचं सरकार प्रत्येक घराघरात पोहचतयं… कारण आम्ही जनतेतलेच एक आहोत… जनता हेच आमचे कुटुंब आहे नि जनतेची सेवा हीच सरकारची प्राथमिकता आहे. केवळ कुटुंब प्रमुखाचा टेंभा मिरवला म्हणून कुणी कुटुंब प्रमुख होत नसतो… उद्धव ठाकरेजी त्यासाठी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागते. जनता तर दूरच… तुम्हाला स्वतःचा पक्षही सांभाळता आला नाही, हीच वस्तूस्थिती आहे" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"माझी माणसं हेच माझे वैभव"
उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून आज ते अमरावतीत दाखल झाले. अमरावतीत आयोजित सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. मुंह में राम और बगल में छुरी असं आमचं हिंदुत्व नाहीये. आमचं हिंदुत्व म्हणजे अन्य धर्मांचा द्वेष नव्हे, तर हिंदुत्व म्हणजे मुंह में राम और हात में काम, असं आमचं हिंदुत्व आहे. माझी माणसं हेच माझे वैभव, असंही ठाकरे म्हणाले.
"रात्रीच्या भेटीगाठी करून माझं सरकार पाडलं"
मी रुग्णालयात असताना यांनी कारस्थान रचलं. रात्रीच्या भेटीगाठी करून माझं सरकार पाडलं. आता दिवसरात्र उद्धव ठाकरे.. उद्धव ठाकरे करता का माझ्याकडे काहीही नाही, मग मला इतकं का घाबरता? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. आज तुमच्याकडे खोकेच्या खोके पडले आहेत. तुम्ही आमदार विकत घेताय असं मी ऐकतोय. पण त्याच पैशातून माणसं वाचवा ना. माणसं वाचवली तर तुम्हाला कोणाला विकत घेण्याची गरजच लागणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.