Chitra Wagh : "तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा…"; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 10:25 AM2023-05-02T10:25:30+5:302023-05-02T10:40:31+5:30
BJP Chitra Wagh And Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी "आपल्या सगळ्यांना शहाणे होण्याची वेळ आली आहे. नुसती वज्रमूठ करून उपयोग नाही. हा भगवा या वज्रमूठीत घट्ट धरायचा आहे. भगव्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो साफ करून छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा भगवा पुन्हा एकदा तेजाने उंच फडकवत ठेवायचा आहे. याची सुरुवात महापालिकेपासून करायची आहे. उद्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेतल्या तरी तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही" असा स्पष्ट इशारा दिला आहे. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे.
"तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा" असं म्हणत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खोचक टोला लगावला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई तोडण्याची जुनी कॅसेट वाजवायला सुरू केलीय. पण जनता सुज्ञ आहे. तुमच्या या भूलथापांना जनता भीक घालणार नाही. आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही… तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही उद्धव ठाकरे."
उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई तोडण्याची जुनी कॅसेट वाजवायला सुरू केलीय. पण जनता सुज्ञ आहे. तुमच्या या भूलथापांना जनता भीक घालणार नाही. आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही… तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही @OfficeofUT
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 1, 2023
तुम्ही मुंबईची काळजी करू नका… मुंबई सांभाळण्यासाठी @Dev_Fadnavis…
"तुम्ही मुंबईची काळजी करू नका… मुंबई सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी सक्षम आहेत. तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा…" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच सबझूट_सभा आणि मोकळी_मूठ असे हॅशटॅग देखील वापरले आहेत. "उद्धव ठाकरे, तुम्ही जमीन दाखवण्याच्या वल्गना करू नका... भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाहजी यांनी तुम्हाला आधीच आसमान दाखवलंय.. चिखलात लोळवलंय अन् चीतपट केलंय" असं म्हणत चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
उद्धव ठाकरे, तुम्ही जमीन दाखवण्याच्या वल्गना करू नका.. @OfficeofUT
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 1, 2023
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री मा.@AmitShah जी यांनी तुम्हाला आधीच आसमान दाखवलंय.. चिखलात लोळवलंय अन् चीतपट केलंय.@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra#सबझूट_सभा#मोकळी_मूठ
महाविकास आघाडीचे सरकार असताना मराठी भाषा सक्तीची केली होती. मात्र, सरकार पाडले, गद्दारी केली आणि तो निर्णयही त्यांनी फिरवला. हेच का तुमचे बाळासाहेबांचे विचार, कुठे आहेत बाळासाहेबांचे विचार, हीच तुमची वृत्ती असेल, तुम्हीच असे मराठी भाषेचे धिंडवडे काढणार असाल तर मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार तरी कोण, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. २०१४ साली सांगितले होते की अच्छे दिन येणार, आले का अच्छे दिन? आतापर्यंत हजारो -लाखो लोकांना नोकऱ्या मिळायला हव्या होत्या, दिल्या का नोकऱ्या? सत्तेत आल्यानंतर जातीय दंगली घडवायच्या, जातीय तणाव निर्माण करायचे. तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करायचा. रक्त सांडायचे. निवडणुका आल्या की पुन्हा काहीतरी थाप ठोकायची. पुन्हा निवडून यायचे, यामध्ये देशाची वाट लागतेय, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"