नागपुरात सेनेच्या जागांवर भाजपाचा दावा
By admin | Published: August 6, 2014 01:49 AM2014-08-06T01:49:20+5:302014-08-06T01:49:20+5:30
राज्यात पुढच्या काळात महायुतीचीच सत्ता येईल, अशी आशा भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांना असल्याने पक्षाकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणा:यांची संख्या वाढली आहे
Next
नागपूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश विधानसभा निवडणुकीतही कायम राहील व राज्यात पुढच्या काळात महायुतीचीच सत्ता येईल, अशी आशा भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांना असल्याने पक्षाकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणा:यांची संख्या वाढली आहे. त्याचे प्रतिबिंब मंगळवारी झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीवेळी दिसून आले. इच्छुकांनी गर्दी केली. उत्साहाच्या भरात जिल्ह्यात शिवसेनेसाठी सोडलेल्या तीन जागांवरही कार्यकत्र्यानी दावा केला. निरीक्षकांनी मात्र हा दावा नव्हता, तर पक्षबांधणीसाठी चर्चा होती, असे नंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्ष निरीक्षक आमदार आशिष शेलार आणि प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर मंगळवारी नागपुरात आले होते. त्यांनी रविभवन सभागृहात सकाळी 1क् पासून मुलाखतींना सुरुवात केली. प्रथम ग्रामीणमधील सहा व नंतर शहरातील सहा मतदारसंघातील इच्छुकांशी निरीक्षकांनी संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली.
काटोल, रामटेक व शहरात दक्षिण नागपूर हे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला आहेत. त्यापैकी रामटेकमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार आहे. रामटेकच्या मुलाखती सुरू होत्या तेव्हा रविभवनात शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. सूत्रंच्या माहितीनुसार येथून अविनाश खळतकर यांनी दावेदारी पुढे केली. मात्र, निरीक्षक आशिष शेलार यांनी आम्ही रामटेक व काटोलमधून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले नाहीत, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची सूचना त्यांना केली, असे स्पष्ट केले. तर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान आमदार देवेंद्र फडणवीस यांचा असल्याने तेथे कोणीही दावा केला नाही. शिवसेनेच्या वाटय़ाला आलेला दक्षिण नागपूर मतदारसंघ भाजपासाठी सोडावा, अशी एकमुखी मागणी या मतदारसंघातील भाजपा नेत्यांनी केली. (प्रतिनिधी)
च्सूत्रंच्या माहितीनुसार, येथून अविनाश खळतकर यांनी दावेदारी पुढे केली. मात्र, निरीक्षक आशिष शेलार यांनी आम्ही रामटेक व काटोलमधून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले नाहीत, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची सूचना त्यांना केली, असे स्पष्ट केले.