मुस्लिमांच्या आग्रहामुळे सेनेशी आघाडी; चव्हाणांचा वक्तव्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:31 PM2020-01-21T12:31:54+5:302020-01-21T12:33:01+5:30
या साठीच शिवसेनेना नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहे का ? असेही सोमय्या यावेळी म्हणाले.
मुंबई : मुस्लिमांच्या आग्रहामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केल्याचे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. तर त्यांच्या या विधानामुळे आता भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना आणि खासदार संजय राऊत याचं हेच उद्देश होत का ? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीएए, एनआरसी, एनपीआर च्या विरोधात मागील ६ दिवसांपासून सर्वपक्षीय नेते बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंत्री अशोक चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले होती की, 'आमचा सर्वात मोठा शत्रू भाजप असून त्यांना सत्तेपासून दूरू ठेवण्यासाठी काँग्रेसने आघाडीत सामील व्हावे असा आग्रह मुस्लीम समाजाने केला होता. त्यामुळे आम्ही आज सत्तेत आहोत.'
चव्हाण यांनी केलेल्या या विधानामुळे आता भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांच्या वक्तव्यावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, 'भाजपला सत्तेपासून दूरू ठेवण्यासाठी आणि मुस्लिमांच्या आग्रहामुळे सेनेशी आघाडी केल्याचा खुलासा चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि संजय राऊत याचं हेच उद्देश होत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून. या साठीच शिवसेनेना नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहे का ? असेही सोमय्या यावेळी म्हणाले.