“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 16:50 IST2024-04-27T16:49:25+5:302024-04-27T16:50:44+5:30
BJP DCM Devendra Fadnavis News: नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झाले नव्हते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
BJP DCM Devendra Fadnavis News: नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा महाराष्ट्रातील एका नेत्यांनी म्हटले होते की, नरेंद्र मोदी यांना उसाच्या शेतीबाबत काय कळते. नरेंद्र मोदी यांना साखर कारखान्याबाबत काय कळते. आता दहा वर्षांनंतर दाव्याने सांगतो की, ६० वर्षांचा त्यांचा इतिहास काढा आणि १० वर्षांचा मोदींचा कार्यकाळ काढा. साखर कारखान्यांसाठी आणि उसाच्या शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी जेवढे निर्णय घेतले, तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झाले नव्हते, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सांगलीत भाजपाकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. सांगलीमध्ये संजयकाका पाटील यांच्यासह अजून काही उमेदवार उमेदवार आहेत. या उमेदवारांची ही निवडणूक नाही. या निवडणुकीत दोनच पर्यांय आहेत. एक पर्यांय नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी आहेत. एकीकडे आपली महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले
काँग्रेसच्या सरकारने अनेक वर्ष राज्य केले. आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगले. पण जनतेला फक्त चॉकलेट दिले. दुसरीकडे आपण ८० कोटी नारगरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुतीची विकासाची ट्रेन आहे. या विकासाच्या ट्रेनमध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आहेत. महायुतीची ही गाडी सबका साथ सबका विकास म्हणत पुढे चालली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, निर्यात बंदी झाल्याननंतर केंद्र सरकारने कांद्याची खरेदी केली आहे. विरोधकांना शेतकऱ्यांचे दुःख नाही, आपला एक मुद्दा संपला हे त्यांचे दुःख आहे. शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होणार आहे. शरद पवार यांच्यासाठी मोदी पंतप्रधान होणे धोक्याचे आहे. कारण, देशाकरिता जे मोदींनी केले आहे त्यामुळेच सर्व जण मोदींना मत देत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.