ठाकरे सरकारची केंद्राकडे तक्रार; आता पुढे काय घडणार? सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 04:24 PM2022-04-25T16:24:16+5:302022-04-25T16:25:00+5:30

सोमय्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली गृहराज्यमंत्र्यांची भेट

BJP delegation meets mos home affairs nityanand rai over attack on Kirit Somaiya | ठाकरे सरकारची केंद्राकडे तक्रार; आता पुढे काय घडणार? सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

ठाकरे सरकारची केंद्राकडे तक्रार; आता पुढे काय घडणार? सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

Next

नवी दिल्ली: राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आज केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली. माजी खासदार किरीट सोमय्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाचे ८ विद्यमान खासदार-आमदार राय यांना भेटले. राज्यात घडत असणाऱ्या घटनांची माहिती भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळानं राय यांना दिली. राय यांनी महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केल्याची माहिती सोमय्यांनी दिली.

भाजप नेत्यांनी राय यांच्यासोबत २० ते २५ मिनिटं चर्चा केली. भाजपच्या नेत्यांवर सातत्यानं होत असलेल्या हल्ल्यांची आणि ढासळलेल्या कायदा, सुव्यवस्थेची माहिती राय यांनी देण्यात आल्याचं सोमय्यांनी सांगितलं. या प्रकरणी अहवाल मागवून घेणार असल्याचं राय म्हणाले. ठाकरे सरकारच्या कार्यकाळात राज्यात माफिया राज सुरू असल्याची टीका सोमय्यांनी पुन्हा एकदा केली. 

मला केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा आहे. मात्र तरीही माझ्यावर हल्ला झाला. भारत सरकारच्या कमांडोंना दगडांनी, बुटांनी मारण्यात आलं. मात्र पोलीस आयुक्त संजय पांडेंनी खोटा एफआयआर दाखल केला. त्यामुळेच हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मिळाला. संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत की एका कुटुंबाचे आयुक्त आहेत, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.

Web Title: BJP delegation meets mos home affairs nityanand rai over attack on Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.