Pooja Chavan Suicide Case: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल; भाजप अधिक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 03:14 PM2021-02-26T15:14:11+5:302021-02-26T15:19:45+5:30

पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्यापासून ते १५ दिवस गायब झाले होते. त्यानंतर अचानक त्यांनी पोहरादेवी गडावर येऊन शक्तीप्रदर्शन करून त्यांची बाजू मांडली. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अद्यापही संजय राठोड प्रकरणावरून राजकीय वादळ शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल, अशी मागणी करत भाजप अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

bjp demands that cm uddhav thackeray should take sanjay rathod resignation | Pooja Chavan Suicide Case: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल; भाजप अधिक आक्रमक

Pooja Chavan Suicide Case: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल; भाजप अधिक आक्रमक

Next
ठळक मुद्देसमाजाच्या दबावाला न पडता राजीनामा घ्यावा - प्रवीण दरेकरतोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही - अतुल भातखळकरसंजय राठोड यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच सुभाष देसाईंनी जोडले हात

मुंबई :पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्यापासून ते १५ दिवस गायब झाले होते. त्यानंतर अचानक त्यांनी पोहरादेवी गडावर येऊन शक्तीप्रदर्शन करून त्यांची बाजू मांडली. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अद्यापही संजय राठोड प्रकरणावरून राजकीय वादळ शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल, अशी मागणी करत भाजप अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (bjp demands that cm uddhav thackeray should take sanjay rathod resignation)

समाजाच्या दबावाला न पडता राजीनामा घ्यावा

समाजाच्या दबावाला बळी न पडता राज्यशासक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे बाणा दाखवून संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्युचा छडा लावल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही. संशयाची सुई संजय राठोड यांच्यावर आहे. त्यामुळे राजीनामा घ्यावा. निर्दोषत्व सिद्ध झाल्यास मंत्री पदावर संजय राठोड यांना पुन्हा आणावे, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही

आपला सुसंस्कृतपणाचा बुरखा टिकवण्याचा निलाजरा प्रयत्न सुरू आहे. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर एव्हढंच लॉजिक आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनाम्याची वाट बघण्याची गरज नाही. ते कधीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी करु शकतात. जोपर्यंत संजय राठोड राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत भाजप अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. 

वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा; चित्रा वाघ यांची मागणी

सुभाष देसाईंनी जोडले हात

शिवसेना नेते सुभाष देसाई यांना वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर न बोलता हात जोडले. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणे त्यांनी टाळले. संजय राठोड यांचा पाय आणखीनच खोलात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेकित झाल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ०१ मार्च ते १० मार्च या कालावधीत मुंबईत होणार आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करून या अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. तर, ०८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

Web Title: bjp demands that cm uddhav thackeray should take sanjay rathod resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.