Maharashtra Political Crisis: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री होणार? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यावर मोठी जबाबदारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 02:41 PM2022-08-11T14:41:33+5:302022-08-11T14:43:02+5:30

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपचा नेता पालकमंत्री म्हणून काम पाहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

bjp devendra fadnavis close ones ravindra chavan may guardian minister of cm eknath shinde thane district | Maharashtra Political Crisis: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री होणार? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यावर मोठी जबाबदारी!

Maharashtra Political Crisis: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री होणार? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यावर मोठी जबाबदारी!

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर आता कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आता भाजपचा पालकमंत्री होणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू नेत्यावर पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडानंतर राजकीय स्थिती काहीशी बदलेली दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत भाजपसोबत युती केली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांसोबत त्यांची आधीपासूनच असलेली मैत्री आणखीनच घट्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा नेता पालकमंत्री म्हणून काम पाहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. हा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असून, बंडखोरांसोबत सूरत ते गुवाहाटीपर्यंत हा नेता गेला होता.

देवेंद्र फडणवीसांचा विश्वास आणि एकनाथ शिंदेंशी चांगला कनेक्ट

ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी डोंबिवलीतील भाजप नेते आणि नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आले आहे. रवींद्र चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते मानले जातात. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतही त्यांचा चांगला संवाद आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यात एका मर्जीतील नेत्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी, असा विचार शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस हेदेखील करत असल्याची माहिती आहे. त्यातूनच रवींद्र चव्हाण यांचे नाव समोर आल्याचे समजते.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेकडे आता ठाणे जिल्ह्यात तुल्यबळ नेता नाही. या पार्श्वभूमीवर आसपासच्या शहरातील बड्या भाजप नेत्याकडे ही जबाबदारी सोपवावी लागणार आहे. मात्र अनुभव आणि वयाने ज्येष्ठ असलेल्या नवी मुंबईतील गणेश नाईक आणि किसन कथोरे यांच्यासारख्या नेत्यांकडे हे पद दिले तर नेहमी त्यांना आदेश देणे, त्यांच्याकडून काम करुन घेणे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शक्य होईलच असे नाही. त्यामुळे आपल्या वयाच्या आणि शब्दाच्या अधीन राहू शकेल, अशा रवींद्र चव्हाण यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी, असा विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून केला जात असल्याची माहिती आहे.
 

Web Title: bjp devendra fadnavis close ones ravindra chavan may guardian minister of cm eknath shinde thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.