संजय राऊत यांच्याबद्दल रोज रोज काय बोलायचं? देवेंद्र फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 06:33 PM2021-06-02T18:33:06+5:302021-06-02T18:34:41+5:30
भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या परभणीच्या दौऱ्यावर आहेत.
परभणी: गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे अनेक मुद्द्यांवरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले दिसत आहेत. सत्ताधारी ठाकरे सरकार आणि भाजप यांच्या विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळात खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. यातच आता संजय राऊत यांच्याबद्दल रोज रोज काय बोलायचे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (bjp devendra fadnavis reply sanjay raut on statement)
भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या परभणीच्या दौऱ्यावर आहेत. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथील आरोग्य व्यवस्था, सुविधांची पाहणी फडणवीस यांनी केली. यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेसंदर्भात फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी टोला लगावला.
‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव अजून ठाकरे सरकारच्याच विचाराधीन!; भाजपचा मोठा दावा
संजय राऊत यांच्याबद्दल रोज रोज काय बोलायचं?
मी कालच संजय राऊत यांच्याबद्दल बोललो आहे. त्यांच्याबद्दल मी रोज रोज काय बोलावं. ते एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. राज्यातील कोरोना मृत्यूची संख्या दडवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच परभणीतील कोरोना परिस्थिती बरी आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न सुरू केला आहे. ही समाधानकारक बाब आहे, असे ते म्हणाले.
पीक विमा आणि केंद्र सरकारचा काहीच संबंध नाही
पीक विमा आणि केंद्र सरकारचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने टेंडर उशिरा काढले. तसेच पीक विम्याचे नियम बदलले. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले जात होते. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विभ्याचा लाभ मिळत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये योगीच! भाजप नेत्यांनी दिला फिडबॅक; PM मोदी, अमित शहांचाही पाठिंबा?
एक दिवस ते मातोश्रीवरही येतील
विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगले आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचे स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचे मार्गदर्शन घेतले असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतला होते. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.