Devendra Fadnavis : Video - "देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः! गिरीशभाऊ... कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 10:18 AM2023-02-17T10:18:31+5:302023-02-17T10:36:59+5:30

Devendra Fadnavis And Girish Bapat : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

BJP Devendra Fadnavis Share Girish Bapat Video Over Twitter | Devendra Fadnavis : Video - "देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः! गिरीशभाऊ... कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात..."

Devendra Fadnavis : Video - "देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः! गिरीशभाऊ... कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात..."

googlenewsNext

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे.ही निवडणूक चुरशीची होणार असून सर्व पक्ष निवडणुकीसाठी कंबर कसून प्रयत्न करणार आहेत. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने त्यांनीही जिंकण्याचा निर्धार केला आहे. अशातच तब्बल ५ वेळा कसब्यातून आमदारकी जिंकणारे गिरीश बापट आता आजारपणातही प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. 

थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल असा विश्वास त्यांनी केसरीवाडा येथे व्यक्त केला आहे. याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. "गिरीशभाऊ...कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात. इथल्या मनामनांत तुम्ही भाजपाचे कमळ रुजवले" असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"असे खंबीर नेते, असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची ताकद, हीच भाजपची ओळख. देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः! गिरीशभाऊ... कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात. इथल्या मनामनांत तुम्ही भाजपाचे कमळ रुजवले. मतदारराजा तुमचा शब्द राखल्याशिवाय राहणार नाही!" असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गिरीश बापट म्हणाले, "१९६८ नंतर मी पहिल्यांदा निवडणुकीत सक्रिय नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला अनेक वेळा जिंकू अनेक वेळा हरलो पण पक्ष संघटन राहिले."

"ही निवडणूक चुरशची नाही, ही निवडणूक आपण चांगल्या मताने जिंकणार आहोत. कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. मी गेली अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धन्य मानल आहे. आपला उमेदवार नक्की जिंकून येणार आहे. हेमंतचे काम चांगले आहे थोडे नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


 

Web Title: BJP Devendra Fadnavis Share Girish Bapat Video Over Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.