जय जिजाऊ, जय शिवराय! योगी सरकारच्या 'त्या' निर्णयावर फडणवीसांचं खास ट्विट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 08:27 AM2020-09-15T08:27:02+5:302020-09-15T08:39:26+5:30
योगी सरकारच्या निर्णयावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास ट्विट केलं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय! म्हणत योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती केली आहे.
मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचे (Agra Mughal Museum) नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असं ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास ट्विट केलं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय! म्हणत योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल अशी घोषणा केल्यावर फडणवीस यांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. "जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय! " असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांचा जयजयकार केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. त्यांचं ट्विट फडणवीस यांनी रिट्विट केलं आहे.
।। जय जिजाऊ, जय शिवराय ।।
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2020
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai ! 🙏🏽 https://t.co/Ro8sA00eOa
योगी आदित्यनाथ यांनी "आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल. आपल्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेचे प्रतिक असलेल्या चिन्हांना कुठलेही स्थान नाही. आपल्या सर्वांचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत" असं म्हटलं आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने, राज्यातील 11 हुतात्म्यांच्या नावाने त्यांच्या जिल्ह्यातील एक-एक रस्त्याचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात अधिसूचनादेखील काढली आहे.
योगी आदित्यनाथांनी आग्र्याच्या मुघल संग्रहालयाचं नाव बदललं, आता छत्रपती शिवरायांच्या नावानं ओळखलं जाणार
विभागाकडून जय हिंद वीर पथ योजनेची घोषणाही करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या रस्त्यांवर हुतात्म्यांच्या सन्मानार्थ मोठ-मोठे आकर्षक बोर्ड लावण्याचे निर्देशदेखील दिले आहेत. या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वस्तू आणि दस्तऐवजदेखील असतील. यापूर्वी लखनौचे मुख्य पर्यटन सचिव जितेंद्र कुमार यांनी पर्यटन अधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या संग्रहालयत गॅलरी तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. या गॅलरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीसंदर्भातील दस्तऐवजदेखील बघायला मिळतील.
"उद्धव ठाकरे इतक्या खालच्या पातळीवर जाणारे व्यक्ती असतील हे जनतेला माहीत नव्हतं"https://t.co/FfDelcIQLg#UddhavThackeray#Shivsena#DevendraFadnavis#BJPpic.twitter.com/EvpZCmfudT
— Lokmat (@MiLOKMAT) September 10, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जातोय"
"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान सुरू, हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"
"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत"
"कोरोना किट खरेदीमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार", आपचा योगी सरकारवर हल्लाबोल