भाजपाला रालोआची गरज नाही - संजय राऊत
By Admin | Published: July 18, 2015 01:52 AM2015-07-18T01:52:33+5:302015-07-18T01:52:33+5:30
केंद्र सरकारकडे संपूर्ण बहुमत असल्याने भाजपाला रालोआची गरज वाटत नसावी; परंतु देशात आणि राज्यात यापुढेही निवडणुका होणार आहेत. बदलत्या मानसिकतेत रालोआची
मुंबई : केंद्र सरकारकडे संपूर्ण बहुमत असल्याने भाजपाला रालोआची गरज वाटत नसावी; परंतु देशात आणि राज्यात यापुढेही निवडणुका होणार आहेत. बदलत्या मानसिकतेत रालोआची गरज भासणार आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या वर्तनाबद्दल नाराजी प्रकट केली.
वाजपेयी-अडवाणी यांच्या काळात रालोआचे महत्त्व होते. नव्या काळात रालोआचे महत्त्व कमी झाले आहे. पूर्वी रालोआच्या नियमित बैठका होत असत. मित्रपक्षांना विश्वासात घेतले जात असे. संवाद होता होता. रालोआची शेवटची बैठक नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी निवड करण्यापूर्वी झाली होती. गेली १० वर्षे भाजपा केंद्रात सत्तेवर नसताना शिवसेना व अकाली दल हे दोन पक्ष रालोआत राहिले. याची आठवण भाजपाने ठेवायला हवी, अशी मागणी राऊत यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)