'अब की बार, शिंदे सरकार'; विश्वासदर्शक ठराव जिंकला, शिवसेनेला धक्का दिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 11:19 AM2022-07-04T11:19:19+5:302022-07-04T11:43:32+5:30

बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटानं मारली बाजी

bjp eknath shinde shivsena won floor test maharashtra vidhan sabha government devendra fadnavis ajit pawar | 'अब की बार, शिंदे सरकार'; विश्वासदर्शक ठराव जिंकला, शिवसेनेला धक्का दिला!

'अब की बार, शिंदे सरकार'; विश्वासदर्शक ठराव जिंकला, शिवसेनेला धक्का दिला!

Next

विधानसभेचे अध्यक्षपद जिंकत एकनाथ शिंदे-भाजप सरकारने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिला डाव जिंकला. आता शिंदे सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून त्या निमित्ताने सत्तापक्ष व विरोधक यांच्यातील दुसरा सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार अनुपस्थित असताना १६४ मते घेत भाजपचे राहुल नार्वेकर जिंकले. आता नवे सरकार विश्वासमतही जिंकेल अशी स्थिती आहे. दरम्यान, विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमत जिंकलं. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. दरम्यान, सपा आणि एमआयएमचे आमदार यावेळी तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली. 

शिवसेना पक्षाकडून काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन व्हिप काल जारी करण्यात आले होते. विधानसभेच्या कामकाजाच्या पटलावर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशा दोघांच्याही व्हिपची नोंद करण्यात आली होती. काल रात्री उशिरा नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली नियुक्ती योग्य असल्याचं मान्य केलं आहे. तसंच शिवसेना विधीमंडळाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू आणि गटनेते अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. 

चाचणीपूर्वी बांगरही शिंदे गटात
बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. इतके दिवस उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे संतोष बांगर हेदेखील आता शिंदे गटात सामील झाले. यानंतर शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० वर पोहोचली. हिंगोली मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आता शिंदे गटात सामील झाले आहे. संतोष बांगर अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बाजूनं होतं. त्यांनी काल शिंदे गटाच्या विरोधात मतदान केलं होतं. पण आज सकाळी ते ट्रायडंट हॉटेलमधून शिंदे गटाच्या बसमध्ये उपस्थित असल्याचं दिसून आलं.

Web Title: bjp eknath shinde shivsena won floor test maharashtra vidhan sabha government devendra fadnavis ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.