भाजपा एक्स्प्रेस सुपरफास्ट

By admin | Published: February 24, 2017 05:12 AM2017-02-24T05:12:09+5:302017-02-24T05:12:09+5:30

नगरपालिका निवडणुकीनंतर नागपूर महापालिकेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BJP Express Superfast | भाजपा एक्स्प्रेस सुपरफास्ट

भाजपा एक्स्प्रेस सुपरफास्ट

Next

नागपूर : नगरपालिका निवडणुकीनंतर नागपूर महापालिकेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ विकास व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांची भाजपा (विकास) एक्स्प्रेस सुसाट धावली. महापालिकेत ‘मिशन १२५’चा संकल्प भाजपाने केला होता. त्यानुसार उपराजधानीत गत अडीच वर्षांपासून भाजपाकडून होत असलेल्या विकासकामांना नागपूरकरांनी कौल दिला आहे. गटबाजीत अडकलेल्या काँग्रेसला भाजपाने चारीमुंड्या चीत केले आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचा भाजपाचे दिलीप दिवे यांनी दणदणीत पराभव केला.
भाजपाने विकास करणाऱ्यांनाच संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसारच तिकीटवाटप करण्यात आले होते. तिकीटवाटप करताना भाजपाने २४ विद्यमान नगरसेवकांना डच्चू दिला होता. त्यामुळे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. काही ठिकाणी तर संघ स्वयंसेवकदेखील भाजपाच्या उमेदवारांच्या विरोधात उभे ठाकले. मात्र त्या सर्वच बंडखोरांना पराभवाची धूळ पत्करावी लागली आहे.
भाजपाच्या निवडणुकांची धुरा आ. अनिल सोले व शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्याकडे होती. इतर पक्षांना डोके वर काढण्याची संधीच भाजपाने दिली नाही.

नागपूर
पक्षजागा
भाजपा१०८
शिवसेना०३
काँग्रेस२७
राष्ट्रवादी०१
इतर१२

Web Title: BJP Express Superfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.