गुजरातच्या अंतर्गत भागात भाजपाला उद्रेकाची भीती

By admin | Published: August 24, 2015 01:32 AM2015-08-24T01:32:08+5:302015-08-24T01:32:08+5:30

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून गुजरातमध्ये कोणत्याही महत्वाच्या राजकीय कार्यक्रमासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) कुमक दुपटीने तैनात केली

BJP fears outbreaks of development in Gujarat | गुजरातच्या अंतर्गत भागात भाजपाला उद्रेकाची भीती

गुजरातच्या अंतर्गत भागात भाजपाला उद्रेकाची भीती

Next

डिप्पी वांकाणी, मुंबई
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून गुजरातमध्ये कोणत्याही महत्वाच्या राजकीय कार्यक्रमासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) कुमक दुपटीने तैनात केली जात आहे. महाराष्ट्र, गोवा व गुजरातची जबाबदारी असलेल्या सीआरपीएफच्या अंतर्गत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये दूर अंतरावरील भागात भाजपसाठी सर्व काही ‘आलबेल’. कारण तेथे लोकांमध्ये केव्हाही उद्रेक होऊ शकतो अशी भीती पक्षाला आहे.
गुजरातमध्ये या आधी रथयात्रेत सीआरपीएफच्या ८ ते १० कंपन्या स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी तैनात केल्या जात होत्या. आता त्याच स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी २० कंपन्या (एका कंपनीत १०० जण असतात) बोलावल्या जातात. केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यापासून अशा स्वरुपाच्या कार्यक्रमांसाठी अशी व्यवस्था दुप्पट संख्येने तैनात केली जात आहे, असे सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हा अधिकारी म्हणाला, ‘‘भाजपचे वरिष्ठ नेते ज्या मेळाव्यांमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करणार असतात त्यावेळी सीआरपीएफ मोठ्या प्रमाणावर तैनात केले जाते. असा प्रकार हा केवळ भाजपची सत्ता असलेल्या महाराष्ट्र किंवा गोव्यापुरता मर्यादित नाही तर नवरात्र, रथयात्रा आणि इतर सणांच्या वेळी सीआरपीएफ नेहमी तैनात केले जाते. प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेले आमचे अधिकारी गुजरातमधील परिस्थितीची आम्हाला माहिती देतात. त्यानुसार गुजरातमध्ये कायदा
आणि सुव्यवस्था परिस्थिती खूपच तणावाची असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करावा लागतो.’’
अहमदाबाद, सूरत व बडोदासारख्या मोठ्या शहरांत खूप काही तणाव नसला तरी सणांच्या दिवसांत दूर अंतरावरील गावांमध्ये बंदोबस्त वाढवावा लागतो. मिरवणुकांवर दगडफेकीचे प्रकार हे नित्याचेच आहेत. सगळी कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडविण्यास अशी एखादी छोटी घटनाही पुरेशी ठरते, असे अधिकारी म्हणाला.

Web Title: BJP fears outbreaks of development in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.