भाजपा सरकार विसर्जन मिरवणूक

By admin | Published: September 19, 2016 12:40 AM2016-09-19T00:40:29+5:302016-09-19T00:40:29+5:30

अच्छे दिनाची स्वप्ने दाखविणाऱ्या भाजपा-सेना सरकारने व्हॅटच्या दरात एक टक्का वाढ करून जनतेला महागाईची भेट दिली आहे.

BJP government's immersion procession | भाजपा सरकार विसर्जन मिरवणूक

भाजपा सरकार विसर्जन मिरवणूक

Next


पुणे : महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनाची स्वप्ने दाखविणाऱ्या भाजपा-सेना सरकारने व्हॅटच्या दरात एक टक्का वाढ करून जनतेला महागाईची भेट दिली आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विभागाच्या कार्यकर्त्यानी भाजपा-शिवसेना सरकारची विसर्जन मिरवणूक काढून महागाईच्या राक्षसाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे विसर्जन केले.
लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या वेळी कसबा विभाग अध्यक्ष आशिष देवधर, उपशहराध्यक्ष प्रल्हाद गवळी, प्रकाश ढमढेरे, गणेश भोकरे, वसंत खुटवड, रवी सहाणे, विजय रजपूत, स्वप्निल फुगे, सागर पांगारे, नीलेश हांडे, वैभव पोंक्षे, शंकर भोसले, बबलू नाईक, नीलेश इनामके उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>दरवाढ रद्द न केल्यास आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सर्व सामान्य नागरिकांना महागाई वाढीची ‘रिटर्न गिफ्ट’ देण्यात आले आहे.
गणपतीचे विसर्जन होताच राज्याच्या मंत्रिमंडळाने दिवाळीपूर्वीच जनतेला महागाईची ही भेट दिली आहे. व्हॅटच्या दरातील वाढ आणि पेट्रोलवरील विक्रीकर दीड रुपया प्रतिलिटरने वाढविण्यात आला असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे मोटारसायकल, पेपर, मसाले, मिठाई, फळे, भाज्या आदी वस्तू महागणार आहेत. त्याचा मनसेतर्फे निषेध करण्यात आला. ही दरवाढ रद्द न केल्यास मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला.

Web Title: BJP government's immersion procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.