भाजपाने माढ्यातून लढण्याची मला दिली होती ऑफर : महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 07:58 PM2019-04-10T19:58:35+5:302019-04-10T20:08:17+5:30

आमची ताकद वाढल्यानेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुलीच्या प्रचारासाठी आता घोंगडी बैठका देखील घ्याव्या लागत आहेत,

The BJP had given me to chance of fight from madha : Mahadev Jankar | भाजपाने माढ्यातून लढण्याची मला दिली होती ऑफर : महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

भाजपाने माढ्यातून लढण्याची मला दिली होती ऑफर : महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

Next
ठळक मुद्देपुढील पाचवर्ष महायुतीबरोबच राहणार मोठा भाऊ म्हणून भाजपने माझे काहीप्रमाणात केले नुकसान  बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी चांगले वातावरण

बारामती : बारामतीची जागा मिळवण्यात माझी ताकद कमी पडली. मोठे पक्ष लहान पक्षाला दाबतात. भाजपने मला त्यांच्या चिन्हावर निवडणुक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र मी त्याला नकार दिला. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वी देखील भाजपाने माढ्यातून माझ्याच पक्ष चिन्हावर निवडणुक लढवण्याची विनंती केली होती, मात्र आता वेळ गेली आहे असे सांगून मी निवडणुक लढणार नसल्याचे सांगितले, असा गौप्यस्फोट दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. 
बारामती येथे कार्यकर्ता बैठकीनंतर जानकर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आमच्यामध्ये वादावादी झाली तरी मी पुढील पाचवर्ष महायुतीबरोबच राहणार आहे. भाजपने जरी रासप आमदार राहूल कुल यांच्या पत्नीला बारामतीमधून उमेदवारी दिली तरी राहूल कुल रासप सोडणार नाहीत. आमचे यावेळी नुकसान झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. मात्र कार्यकर्त्यांना समजाविण्यासाठीच मी आता फिरत आहे. खासकरून बारामती व माढा मतदारसंघामध्ये माझ्यापक्षाची ताकद लावणार आहे. तेथील महायुतीच्या उमेदवारासाठी रासप काम करणार आहे, असे यावेळी जानकर यांनी सांगितले. यावेळी जानकर यांनी आपली  उद्विग्नता  बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘मोठा भाऊ म्हणून भाजपने माझे काहीप्रमाणात नुकसान केले आहे. मात्र मी देखील त्यांना माझ्याशिवाय तुम्हाला राज्यात यश मिळणार नसल्याचे  सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत देखील मी तुमचा कार्यकर्ता नसून मित्र आहे. मित्रासारखी मला वागणूक द्या असे सांगितले होते. 

 बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी चांगले वातावरण आहे. आमची ताकद वाढल्यानेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुलीच्या प्रचारासाठी आता घोंगडी बैठका देखील घ्याव्या लागत आहेत, असा टोला जानकर यांनी लगावला.
 

Web Title: The BJP had given me to chance of fight from madha : Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.