Maratha Reservation: “उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार”: हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 10:21 PM2021-06-01T22:21:49+5:302021-06-01T22:24:43+5:30

Maratha Reservation: भाजपा नेते व मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत.

bjp harshvardhan patil says udayanraje bhosale ready to take initiative for maratha reservation movement | Maratha Reservation: “उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार”: हर्षवर्धन पाटील

Maratha Reservation: “उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार”: हर्षवर्धन पाटील

ठळक मुद्देउदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयारसंभाजीराजे आणि फडणवीस यांच्यात प्रदीर्घ चर्चाहर्षवर्धन पाटील यांची माहिती

सातारा: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा मराठा समाजामध्ये नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकीकडे संभाजीराजे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू असताना दुसरीकडे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. (bjp harshvardhan patil says udayanraje bhosale ready to take initiative for maratha reservation movement)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर पुन्हा हा मुद्दा चर्चिला जाऊ लागला. मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली. यावरून भाजपने ठाकरे सरकारला घेरले असून, आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते व मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मराठा समाजातील प्रमुख लोकांशी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. 

उदयनराजे मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार

उदयनराजे यांनी ट्विट करून हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीविषयी माहिती दिली. तर हर्षवर्धन पाटील यांनी उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आपण उदयनराजे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत समाजावर अन्याय झालेला आहे. या संदर्भात आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर आंदोलनबाबत पुढाकार घेण्यास ते तयार आहेत, असे पाटील यांनी सांगितले. 

“मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे द्यावेत” 

संभाजीराजे आणि फडणवीस यांच्यात प्रदीर्घ चर्चा

संभाजीराजे छत्रपती यांना भाजप डावलत आहे का? असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांना विचारला असता, संभाजीराजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आहे. संभाजीराजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्व राजकीय पक्ष, तसेच संघटनांना भेटत आहेत. आम्ही भाजप म्हणून सवतासुभा मांडलेला नाही. त्याची गरजही नाही. हे आंदोलन राजकीय पक्षांचे नाही, समाजाचे आहे. समाजासाठी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आरक्षण कसे मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

मोठा दिलासा! कोरोनाच्या उपचारांसाठी दर ठरले; ठाकरे सरकारची अधिसूचनेला मंजुरी

दरम्यान, मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात १० टक्के आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण मिळणार असून, या निर्णयामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला १० टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता, तसा निर्णय सरकारने घेतला होता. आता मात्र मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा  निर्णय सरकारने दिला आहे. 
 

Web Title: bjp harshvardhan patil says udayanraje bhosale ready to take initiative for maratha reservation movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.