भाजयुमोला हव्यात ९२ जागा
By admin | Published: January 19, 2017 03:16 AM2017-01-19T03:16:06+5:302017-01-19T03:16:06+5:30
शिवसेना, भाजपातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. युतीच्या जागावाटपात ११५ जागा मिळाव्यात
मुंबई : शिवसेना, भाजपातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. युतीच्या जागावाटपात ११५ जागा मिळाव्यात, असा हट्ट भाजपाने धरला असतानाच भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो)ने मात्र आपल्या कार्यकर्त्यांची यादीच मुंबई भाजपा अध्यक्षांकडे पाठविली आहे. यात ९२ कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी भाजयुमोचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी केली आहे.
भाजपाकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांत डॉक्टर्स, वकील तसेच सीए यांसारख्या सुशिक्षितांचा समावेश आहे. अधिकाधिक युवकांनी राजकारणात सक्रिय व्हावे, या उद्देशाने भाजयुमोने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘युथ फॉर एमसीजीएम’ नावाची मोहीम सुरू केल्याचेही कंबोज यांनी सांगितले.
निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांच्या साथीने मुंबई भाजयुमोचे युवा कार्यकतेर्ही कामाला लागले आहेत. महापालिकेत युवकांना अधिक प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे. त्याचाच एक भाग म्हणून भाजयुमोच्या तब्बल ९२ युवा इच्छुक उमेदवारांची यादी पक्षाला दिल्याचे कंबोज म्हणाले. (प्रतिनिधी)