३० ऑक्टोबरला भाजपाच्या आमदारांची बैठक, सत्त्तास्थापनेबाबत मंथन होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 05:00 PM2019-10-26T17:00:06+5:302019-10-26T17:00:09+5:30
विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपाच्या सत्तास्थापनेच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपाच्या सत्तास्थापनेच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. इतर पक्षांपेक्षा जवळपास दुप्पट जागा जिंकूनही भाजपाला सत्तास्थापनेसाठी शिवसेनेवर अवलंबून राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत भाजपाच्या नवनियुक्त आमदारांची बैठक ३० ऑक्टोबर रोजी होईल. या बैठकीला भाजपाचे सर्व १०५ आमदार उपस्थित राहणार असून, यावेळी विधिमंळ नेत्याची निवड आणि भावी वाटचालीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
भाजपाच्या नवनियुक्त आमदारांची बैठक ३० ऑक्टोबर रोजी विधान भवनात होणार आहे. यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड होईल. भाजपाचे सर्व १०५ आमदार या बैठकीस उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
BJP Maharashtra President, Chandrakant Patil: BJP has called legislative party meeting on 30th October at Vidhan Bhavan to elect leader in the house. All 105 MLAs to attend the meeting. (File pic) pic.twitter.com/dMd9fq86iW
— ANI (@ANI) October 26, 2019
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत.
दरम्यान, निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेच्या चढाओढीवरून कुरघोडी सुरू झाली आहे. तसेच शिवसेना भाजपाला सत्तावाटपाच्या ५०-५० फॉर्म्युल्याची सतत आठवण करून देत आहे.