भाजपाला सत्तेची संधी
By Admin | Published: February 24, 2017 04:24 AM2017-02-24T04:24:52+5:302017-02-24T04:24:52+5:30
भारतीय जनता पक्षाने गडचिरोली जिल्हा परिषदेवर २० जागा मिळवित मोठा पक्ष म्हणून यश मिळविला
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाने गडचिरोली जिल्हा परिषदेवर २० जागा मिळवित मोठा पक्ष म्हणून यश मिळविला आहे. काँग्रेसने गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागा अधिक जिंकून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा तडाखा बसला असून गेल्यावेळपेक्षा राष्ट्रवादीच्या चार जागा कमी झाल्या आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या दोन कन्या मैदानात होत्या. त्यापैकी मोठ्या कन्येला यश मिळाले आहे. तर धाकटी कन्या पराभूत झाली.
अहेरी विधानसभा क्षेत्रात राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व राकाँचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांना प्रचंड मोठी धोबीपछाड देत आदिवासी विद्यार्थी संघाने माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात लक्षवेधी यश संपादन केले आहे.
पालकमंत्री आत्राम यांच्या भागात भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले आहे. गतवेळी शिवसेनेच्या दोन जागा होत्या. यावेळी सेना जिल्ह्यातून नामशेष झाली आहे. भाजपा आदिवासी विद्यार्थी संघाच्या मदतीने जिल्हा परिषदेची सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय सत्तेच्या बाबत दिसून येत नाही. (प्रतिनिधी)
गडचिरोली
पक्षजागा
भाजपा२०
शिवसेना00
काँग्रेस१५
राष्ट्रवादी०५
इतर११