भाजपाला दोन तर राष्ट्रवादीला एक जागा
By Admin | Published: June 26, 2014 12:48 AM2014-06-26T00:48:32+5:302014-06-26T00:48:32+5:30
राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये दोन जागांवर भाजपा, एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आह़े तर शिक्षक मतदारसंघांच्या दोन्ही जागांवर अपक्षांनी विजयाचा ङोंडा रोवला आह़े
>पदवीधर मतदारसंघ : शिक्षक मतदारसंघात अपक्ष
मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये दोन जागांवर भाजपा, एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आह़े तर शिक्षक मतदारसंघांच्या दोन्ही जागांवर अपक्षांनी विजयाचा ङोंडा रोवला आह़े
नागपूर आणि पुणो पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे अनुक्रमे अनिल सोले आणि चंद्रकांत पाटील आणि औरंगाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हे विजयी झाले आहेत़ तर पुणो आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अनुक्रमे दत्ता सावंत आणि श्रीकांत देशपांडे विजयी झाले आहेत़ मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे शिरीष बोराळकर यांचा पराभव केला. नागपूरमध्ये भाजपाचे अनिल सोले यांनी काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे यांना पराभूत केले. पुणो मतदारसंघात भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार सारंग पाटील यांचा 238क् मतांनी पराभव केला़ पुणो शिक्षक मतदारसंघात अपक्ष दत्ता सावंत यांनी मोहन राजमाने यांच्यावर 1529 मतांनी विजय नोंदविला. तर विद्यमान आमदार भगवानराव साळुंके हे तिस:या स्थानावर राहिले. तर अमरावती मतदारसंघातून अपक्ष (शिक्षक आघाडी) उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 16 व्या फेरीअखेर विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी अपक्ष उमेदवार अरुण शेळके यांचा 4 हजार 942 मतांनी पराभव केला.जळगाव विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या छाननीत बुधवारी राष्ट्रवादीचे करण बाळासाहेब पाटील व ज्ञानेश्वर भादू महाजन यांच्यासह एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला. (लोकमत न्यूज नेटवर्क)