स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर भाजपा ठाम

By admin | Published: September 19, 2014 02:32 AM2014-09-19T02:32:19+5:302014-09-19T02:32:19+5:30

विकास आणि सुविधांबाबत विदर्भावर आजर्पयत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अन्याय केला आहे.

BJP on the independent Vidarbha role | स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर भाजपा ठाम

स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर भाजपा ठाम

Next
देवेंद्र फडणवीस : विदर्भावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अन्याय केला 
कोल्हापूर : विकास आणि सुविधांबाबत विदर्भावर आजर्पयत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र एकसंध ठेवणार, असे म्हणण्याचा अधिकार नाही. स्वतंत्र विदर्भाबाबतची आमची मागणी सैद्धांतिक असून या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत फडणवीस कोल्हापूर दौ:यावर आले होते. ते म्हणाले, राज्ये छोटी असल्यास त्यांचा विकास करणो सोयीस्कर होते. महाराष्ट्रात 
असेर्पयत आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रामाणिकपणो प्रयत्न करू. 
राज्यघटनेतील समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे. 
राज्यातील जनतेनेच आता काँग्रेस आघाडीला घरी बसविण्याची तयारी सुरु केली आहे तसेच  कोल्हापूरातील  टोलचा ज्वलंत  प्रश्न राष्ट्रवादी कांॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माहित नाही हे दुर्देव आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी  केली. (प्रतिनिधी) 
 
दोन-तीन दिवसात जागा वाटप
महायुतीमधील  घटक पक्षांबरोबर उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा सुरु आहे. गेली 25 वर्षे शिवसेनेबरोबर आमची युती अभेद्य आहे. त्यांना घेऊनच निवडणूकीला सामोरे जायाची तयारी आहे. निवडणूकीत सन्मानपूर्वक उमेदवार दिले जातील. त्यामुळे  पुढील दोन-तीन दिवसात उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करु , असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
 
विरोधकांकडे प्रचाराचा 
मुद्दाच नाही..
भ्रष्टाचार, घोटाळ्यांचे झालेले आरोप आणि विकासाबाबत विरोधक काँग्रेस-आघाडीकडून काहीच झालेले नाही. विकास आणि अन्य बाबींमध्येदेखील आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्याकडे प्रचाराचा मुद्दाच नाही म्हणूनच ते जातीयवादाचा मुद्दा पुढे करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनता त्याला बळी पडणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. 
 
आर. आर. पाटील हेच खरे संधीसाधू : विनोद तावडे
राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील हेच राजकारणातील  खरे संधीसाधू आहेत अशी टीका करत महायुतीतील घटक पक्षांबरोबर उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे विधानसभेच्या उमेदवारांची यादी रविवारी (दि.21)जाहीर करणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील व्यापारी असून ते गुन्हेगारी स्वरुपाचे राजकारण करीत आहेत, असा आरोपही तावडे यांनी केला.
 

 

Web Title: BJP on the independent Vidarbha role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.