Gram Panchayat elections: ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर 1 - प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 08:39 PM2022-12-20T20:39:13+5:302022-12-20T20:42:52+5:30

निवडणुकीत शहरी मतदारही भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल देईल याचीही व्यक्त केली खात्री

BJP is number one again in Gram Panchayat elections says State President Chandrashekhar Bawankule | Gram Panchayat elections: ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर 1 - प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

Gram Panchayat elections: ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर 1 - प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा

googlenewsNext

Gram Panchayat elections: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये २,४८२ ग्रामपंचायती जिंकून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नंबर वन ठरली आहे, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केला. तसेच या यशाबद्दल आपण कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी युतीला कौल दिला आहे, असे बावनकुळेंनी सांगितले.

"उपलब्ध आकडेवारी ध्यानात घेता भाजपाचा दणदणीत विजय झाल्याचे दिसते. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ८४२ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. आमच्या विरोधी पक्षांच्या एकत्रित संख्येपेक्षा अधिक सरपंच भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे निवडून आले आहेत. सत्तांतरानंतर यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी युतीला पसंती दिली होती," असे त्यांनी स्पष्ट केले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असताना आता महाराष्ट्रातही त्यांच्या विचारांच्या सरकारचे काम राज्यातील जनतेला पसंत पडले आहे. आपण या विजयाबद्दल मा. एकनाथ शिंदे आणि मा. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो. राज्यातील ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत पुनःपुन्हा शिंदे फडणवीस सरकारला पसंती दिली आहे. याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही युती विजयी होईल. तसेच महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत शहरी मतदारही भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल देईल याची खात्री आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: BJP is number one again in Gram Panchayat elections says State President Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.