केव ग्रामपंचायत भाजपाच्या हाती

By admin | Published: July 23, 2016 03:14 AM2016-07-23T03:14:47+5:302016-07-23T03:14:47+5:30

केव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या प्रेमा राऊत यांची तर उपसरपंचपदी शर्मिला नाईक यांची निवड झाली आहे.

BJP in Keew Gram Panchayat | केव ग्रामपंचायत भाजपाच्या हाती

केव ग्रामपंचायत भाजपाच्या हाती

Next


विक्रमगड : महिला सरपंच आरक्षणानुसार सरपंचपदाच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत तालुक्यातील केव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या प्रेमा राऊत यांची तर उपसरपंचपदी शर्मिला नाईक यांची निवड झाली आहे. त्यामुळे ४० वर्षापासून दुसऱ्या पक्षांची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीवर भाजपाने आपला झेंडा रोवला आहे.
तालुक्यात सध्यस्थितीत ३७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुकांचे वातावरण सर्वत्र सुरु असून ज्या ग्रामपंचायतीच्या मुदती जुलैमध्ये संपत आहेत, त्या अनुषंगाने विक्रमगड तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये १३ ग्रामपंचायतीवर भाजपाने आपली बाजी मारली आहे.
केव ग्रामपंचायतीवर ४० वर्षापासून दुसऱ्या पक्षांची सत्ता असलेल्या हा विजय भाजपासाठी मोठा आहे. या दरम्यान भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विजय औसरकर यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा व खासदार चिंंतामण वनगा तसेच जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर गुरुवार विक्रमगड तालुक्यांत भाजपाने भरघोस यश संपादन केले आहे. विक्रमगड तालुक्यात १३ ग्रामपंचायतींवर फक्त भाजपाने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. अजून अनेक ग्रामपंचायती सरपंच निवड बाकी आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पावडे, उपसभापती मधुकर खुताडे, महेश आळशी, सुशील औसरकर, सुधाकर पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
>खोडाळा ग्रामपंचायत शिवसेनेकडेच
मोखाडा : तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आसे व खोडाळा ग्रामपंचायतीत सेनेने एकहाती सत्ता काबीज केली आहे. आसे ग्रामपंचायतीत सरपंचपदी रुखमनी कोरडे, उपसरपंचपदी प्रकाश वाजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खोडाळा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी प्रभाकर पाटील आणि उपसरपंचपदी चंद्रमानी मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
>राजकीय रस्सीखेच शिगेला
राज्यात आणि केंद्रात जरी भाजप आघाडीचे राज्य असले तरी ग्रामपंचाय सरपंच उपसरपच निवडणूकीमध्ये आपले कार्ड चालविणे भाजपाला तेवढे सोपे जात नाही.
जिल्ह्यामध्ये शहरी भागात शिवसेनेच काम चांगले असतांना तर ग्रामिण भागामध्ये माकप व श्रमजीवी संघटना रुजलेली असतांना राजकीय रस्सीखेच शिगेला पोहचली आहे.
>आबिटघर ग्रामपंचायत सेना-माकपकडे
वाडा : तालुक्यातील आबिटघर या ग्रामपंचायतीवर शिवसेना-माकपने आपले वर्चस्व सिद्ध केले असून सरपंचपदी मारूती मोरघा यांची तर उपसरपंचपदी दयानंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात येऊन सत्ता स्थापन केली आहे. सदस्यपदी हर्षला पाटील, आरती पाटील, प्रकाश धनगरे, विनायक वेहळे हे निवडून आले आहेत. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. कुयलू ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेने आपला झेंडा फडकवला असून सरपंचपदी योगिनी कुसल व उपसरपंचपदी राजेश सवर यांची निवड झाली आहे . या ग्रामपंचायतीवर गेली २५ वर्षे कुणबी सेनेची सत्ता होती. तर बिलावली खरीवली या ग्रामपंचायतीवर भाजपाने सत्ता स्थापन केली असून सरपंचपदी रंजिता जाधव यांची तर उपसरपंचपदी महेश जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: BJP in Keew Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.