“राऊतसाहेब, आपण सरकार आहोत की फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा”; भाजपचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 05:32 PM2021-06-05T17:32:32+5:302021-06-05T17:35:02+5:30

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे.

bjp keshav upadhye criticised shiv sena and sanjay raut over marathi | “राऊतसाहेब, आपण सरकार आहोत की फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा”; भाजपचे टीकास्त्र

“राऊतसाहेब, आपण सरकार आहोत की फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा”; भाजपचे टीकास्त्र

Next
ठळक मुद्देभाजपचे संजय राऊत यांच्यावर टीकास्त्रअसत्याचे ओझे, तुम्हालाही डोईजड झाले आहे ना?केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून लगावला टोला

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी भाजप पक्ष अनेकविध मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण यांसारख्या मुद्द्यांवरून भाजप ठाकरे सरकारला घेरताना दिसत आहे. आता मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. (bjp keshav upadhye criticised shiv sena and sanjay raut over marathi)

कोरोनाच्या कालाधीत ठाकरे सरकारकडून काढण्यात येणाऱ्या अधिसूचना इंग्रजी भाषेत काढण्यात येत आहेत. यावरून अनेकांनी राज्य सरकावर टीका केली आहे. मराठी भाषा आणि मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेल्या शिवसेनेनेच्या कार्यकाळात मराठीतून अधिसूचना येत नसल्याबाबत अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत आणि शिवसेनेवर मराठीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. 

“महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, तसे संकेतच आहेत”

असत्याचे ओझे, तुम्हालाही डोईजड झाले आहे ना?

संजय राऊतजी, असत्याचे ओझे, तुम्हालाही डोईजड झाले आहे ना? आधी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याच्या तुमच्या मतास ठाकरे सरकारने पाने पुसली, आता शिवसेनेचा मराठी बाणा खुंटीवर टांगला. राऊत साहेब, आपण सरकार आहोत की फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

वाद वाढणार! ट्विटरने RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली

राऊतसाहेब, म्हणून रिट्विट केलं ना?

तसेही, पत्रकार की खासदार या संभ्रमातच तुम्ही अडकलेले आहात. त्यात आता नवी भर. मराठीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या ठाकरे सरकारला रोखठोक सवाल करायला पत्रकाराचा बाणा लागतो. तुमच्या भावना मांडल्या म्हणून रिट्विट केलं ना?, असा खोचक सवालही केशव उपाध्ये यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये केला आहे. 

“...तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल”: नवाब मलिक

दरम्यान, सावळ्या गोंधळानंतर राज्य सरकारकडून शुक्रवारी मध्यरात्री अनलॉकची अधिसूचना काढण्यात आली. मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण केले जातंय, असा मुद्दा उपस्थित करत एका पत्रकाराने राज्य सरकारच्या इंग्रजीतील अधिसूचनेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले होते. हेच ट्वीट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रिट्विट केले. संजय राऊतांनी तेच ट्वीट रिट्विट केल्यानंतर केशव उपाध्ये यांनी त्यावरून राऊतांवर टीका केली. 
 

Web Title: bjp keshav upadhye criticised shiv sena and sanjay raut over marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.