Coronavirus: ठाकरे सरकार फक्त PR करत ‘बेस्ट सीएम’चे गोडवे गात राहिले; कोरोना मृत्यूवरुन भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 01:00 PM2021-06-10T13:00:19+5:302021-06-10T13:02:13+5:30

Coronavirus: आता भाजपनेही ठाकरे सरकारवर कोरोनाचे मृत्यू लपवल्यावरून पुन्हा एकदा टीका केली आहे.

bjp keshav upadhye criticises thackeray govt over corona death in the state | Coronavirus: ठाकरे सरकार फक्त PR करत ‘बेस्ट सीएम’चे गोडवे गात राहिले; कोरोना मृत्यूवरुन भाजपची टीका

Coronavirus: ठाकरे सरकार फक्त PR करत ‘बेस्ट सीएम’चे गोडवे गात राहिले; कोरोना मृत्यूवरुन भाजपची टीका

Next

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा फटका बसला. कोरोनामुळे होणारे मृत्यूही चिंतेत भर टाकणारे होते. नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसह कोरोनामुळे होणारे मृत्यूही नवीन उच्चांक गाठणारे ठरले. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवले जात असल्याचा आरोप केला जात होता. यातच आता भाजपनेही ठाकरे सरकारवर कोरोनाचे मृत्यू लपवल्यावरून पुन्हा एकदा टीका केली आहे. (bjp keshav upadhye criticises thackeray govt over corona death in the state)

भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार कोरोनाचे मृत्यू लपवत असल्याचा दावा यापूर्वीही केला होता. मात्र, आता राज्यात ११.५ हजार कोरोना मृत्यू लपवल्याचे समोर येत आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली असून, कोरोनाचे मृत्यू लपवल्याप्रकरणी ट्विटरवरून निशाणा साधला आहे. 

राज्य सरकारच्या अपयशाचे वास्तव लपणार नाही

महाराष्ट्रात १ लाख मृत्यु झालेत देशात सर्वाधिक व जगात १० व्या क्रमांकाचे. आता अजून उघड होत आहेत. तब्बल ११५०० मृत्यु लपविले.ठाकरे सरकार फक्त पीआर करत‘बेस्ट सीएम’चे गोडवे ठराविक लोकांकडून घेत राहिले पण लपवाछपवी करूनही राज्य सरकारच्या अपयशाचे वास्तव लपणार नाही, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

देशाची अर्थव्यवस्था वाचवण्याचा ‘हाच’ एकमेव उपाय; माजी गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा पर्याय

११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद झालेली नाही!

आतापर्यंत महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक जणांचे मृत्यू झाले असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात ही संख्या त्याहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. मृतांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद झालेली नसून, ती पुढील दोन दिवसांत करण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिल्याचे सांगितले जात आहे. 

कोरोनाचे मृत्यू लपवले! राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राण; बिहार सरकारची कबुली

दरम्यान, आरोग्य खात्याकडून बाधितांसह मृतांची आकडेवारी दररोज जाहीर करण्यात येते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: अनेकदा मृत्यूदराचे प्रमाण जाहीरपणे सांगितले आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणेने राज्याच्या आरोग्य खात्याला पाठविलेल्या अहवालात नोंदविलेले मृत्यू आणि राज्याच्या आरोग्य खात्याने दाखविलेल्या मृतांच्या संख्येत तफावत असल्याचे समोर आले आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण मृतांच्या संख्येपेक्षा कमी संख्या राज्याच्या दैनंदिन अहवालात दाखविण्यात आल्याचे दिसते. राज्यात ११ हजार ६१७ रुग्णांचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची नोंद अद्याप पोर्टलवर झालेली नाही, असे दिसून येत आहे. 
 

Web Title: bjp keshav upadhye criticises thackeray govt over corona death in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.