Maharashtra Politics: “पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल”; संजय राऊतांना भाजपचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 08:21 PM2023-01-29T20:21:52+5:302023-01-29T20:22:53+5:30

Maharashtra Politics: हिंदू जन आक्रोश मोर्चासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे.

bjp keshav upadhye replied thackeray group sanjay raut over criticism on hindu jan akrosh morcha | Maharashtra Politics: “पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल”; संजय राऊतांना भाजपचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics: “पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल”; संजय राऊतांना भाजपचे प्रत्युत्तर

Next

Maharashtra Politics: दादरच्या शिवाजी पार्कपासून ते कामगार मैदानापर्यंत सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना तसेच भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले. या मोर्चात सहभागी झालेल्या भाजप नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यातच संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. 

शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे हे आक्रोश मोर्चाने सिध्द केले. आठ वर्षांपासून शक्तिमान हिंदू नेत्यांचे राज्य असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे अपयश कोणाचे? काश्मिरात पंडितांचा आक्रोश. कारसेवकांच्या हत्या करणाऱ्या मौ. मुलायम यांना पद्मविभूषण हिंदू आक्रोश करणारच!, असे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. याला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले. 

पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल

केशव उपाध्ये यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल. सळसळत्या हिंदुत्वाचे हुंकार समोर आहे पण त्याला साथ देता येत नाही, कारण उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आणि मुस्लिमांची परिषद घेणाऱ्यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दारात नेऊन ठेवले. बाकी हिंदू समर्थ आहे, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे. 

दरम्यान, लव्ह जिहादच्या विरोधातील हा मोर्चा काढण्यात आला. हे हिंदू राष्ट्र व्हावे ही आमची मागणी आहे. विधान परिषद आणि विधानसभेत लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करणार आहोत. महिलांच्या हितासाठी हा मोर्चा काढला. उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले. आता त्यांनी फक्त एमआयएमसोबत युती करणं बाकी आहे. हिंदुत्ववादाच्या विरोधात जाऊन ते राजकारण करत आहेत, अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bjp keshav upadhye replied thackeray group sanjay raut over criticism on hindu jan akrosh morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.