Keshav Upadhye : "संजय राऊत विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करताहेत"; भाजपाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:25 PM2022-05-04T12:25:04+5:302022-05-04T12:34:02+5:30

BJP Keshav Upadhye And Sanjay Raut : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

BJP Keshav Upadhye Slams Sanjay Raut And Thackeray Government Over mosque loudspeaker | Keshav Upadhye : "संजय राऊत विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करताहेत"; भाजपाचा गंभीर आरोप

Keshav Upadhye : "संजय राऊत विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करताहेत"; भाजपाचा गंभीर आरोप

Next

मुंबई - भोंग्यांवरून सध्या राजकारण तापलं आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "शिवसेनेतील राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय राऊत विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करत आहेत" असा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. तसेच अनाधिकृत भोंग्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत महाविकास आघाडी सरकारमध्ये नाही म्हणून अशाप्रकारे विरोधकांना अडकवण्याचं कटकारस्थान करत आहेत असंही म्हटलं आहे. 

"राज्यात कुठेही दंगलसदृश्य परिस्थिती नाही. तरीही उगाच दंगल, तेढ, अशांतता अशी विधानं करून सरकारचं धार्मिक तेढ निर्माण करण्याचं राजकारण तर करत नाही ना अशी शंका उपस्थित होते" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "एका दिवसांत ८०० मशिदीवरील भोंग्यांना परवानगी देण्यात येते म्हणजे कालपर्यंत हे सगळं अनाधिकृत सुरू होतं याची कल्पना सरकारला होती. मूळात कायद्याचं पालन सर्वांनीच करणं गरजेचे आहे. कायदा हा सर्वांसाठी एकसमान आहे. मग अनाधिकृत भोंग्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत महाविकास आघाडी सरकारमध्ये नाही म्हणून अशाप्रकारे विरोधकांना अडकवण्याचं कटकारस्थान करत आहेत"

"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत अनाधिकृत भोंगे उतरवावेत असं आवाहन राज ठाकरेंनी केले. मात्र सरकार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आहे. त्यात हनुमान चालीसा वाजवतील म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. शरद पवारांचे चाहते आणि शिवसेनेतील राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय राऊत विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य करत आहेत. राज्यात कुठेही दंगलसदृश्य परिस्थिती नाही. तरीही उगाच दंगल, तेढ, अशांतता अशी विधानं करून सरकारचं धार्मिक तेढ निर्माण करण्याचं राजकारण तर करत नाही ना अशी शंका उपस्थित होते" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: BJP Keshav Upadhye Slams Sanjay Raut And Thackeray Government Over mosque loudspeaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.