"...हा तर मराठी माणसाशी अन् महाराष्ट्राशी द्रोह"; भाजपाने शिवसेनेला धारेवर धरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 09:00 AM2022-02-24T09:00:24+5:302022-02-24T09:11:26+5:30

BJP Keshav Upadhye And Nawab Malik : भाजपाने पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. 

BJP Keshav Upadhye Slams Shivsena Over Nawab Malik | "...हा तर मराठी माणसाशी अन् महाराष्ट्राशी द्रोह"; भाजपाने शिवसेनेला धारेवर धरलं

"...हा तर मराठी माणसाशी अन् महाराष्ट्राशी द्रोह"; भाजपाने शिवसेनेला धारेवर धरलं

Next

मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती अटक केली. विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे. मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही, असे महाविकास आघाडीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली. याच दरम्यान आता भाजपाने पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"हा तर मराठी माणसाशी द्रोह; हा महाराष्ट्राशी द्रोह" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "आतंकीसोबत जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांचं समर्थन शिवसेना फक्त मुख्यमंत्रीपदासाठी करणार का?" असा सवाल विचारला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ज्या दाऊदने मुंबईत बॅाम्बस्फोट करून मराठी माणसांना मारले...ज्या दाऊदने शिवसेनाभवनजवळ बॅाम्बस्फोट घडविला... अशा आतंकीसोबत जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांचं समर्थन शिवसेना आता फक्त मुख्यमंत्रीपदासाठी करणार का? हा तर मराठी माणसाशी द्रोह; हा महाराष्ट्राशी द्रोह" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीचे मंत्री, नेते यांची बैठक झाली. ईडी, सीबीआय आदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि भाजपचे षडयंत्र याविरुद्ध महाविकास आघाडीचे सर्व नेते, मंत्री, आमदार, खासदार गुरुवारी सकाळी १० वाजता मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे देतील. शुक्रवारपासून राज्यभर धरणे, मोर्चे असे आंदोलन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीच्या अन्य ज्येष्ठ नेते, मंत्र्यांच्या उपस्थितीत सायंकाळी दीड तास बैठक झाली. या अटकेनंतर महाविकास आघाडीने कोणता पवित्रा घ्यावा यावर विचार झाला. कोणत्याही परिस्थितीत केंद्रीय तपास यंत्रणांसमोर झुकायचे नाही आणि या कारवायांच्या मागे भाजप व केंद्र सरकार असल्याचे जनतेत जाऊन सांगायचे, असा निर्णय बैठकीत झाला. 

 

Web Title: BJP Keshav Upadhye Slams Shivsena Over Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.