Keshav Upadhye : "औरंगाबादच्या नामांतराचे गाजर दाखवून समस्यांपासून लोकांचं लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळवण्याचा पोरखेळ"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 11:42 AM2022-06-08T11:42:10+5:302022-06-08T11:55:48+5:30

BJP Keshav Upadhye And Uddhav Thackeray : भाजपाने मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे

BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray And Shivsena Over Aurangabad rally | Keshav Upadhye : "औरंगाबादच्या नामांतराचे गाजर दाखवून समस्यांपासून लोकांचं लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळवण्याचा पोरखेळ"

Keshav Upadhye : "औरंगाबादच्या नामांतराचे गाजर दाखवून समस्यांपासून लोकांचं लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळवण्याचा पोरखेळ"

Next

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने होणाऱ्या 'हिंदुत्वाचा हुंकार' या घोषवाक्यासह मुख्यमंत्र्यांच्या सभेचा जोरदार प्रचार केला आहे. या सभेवरून भाजपाने मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. "औरंगाबादच्या नामांतराचे गाजर दाखवून समस्यांपासून लोकांचं लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळविण्याचा पोरखेळ" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी (BJP Keshav Upadhye) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मतदारांचा आणि सामान्य शिवसैनिकांचा विश्वासघात करून मुख्यमंत्रीपद बळकावलेल्या उद्धव ठाकरे यांची अडीच वर्षांनंतरची दुसरी सभा संभाजीनगरला होणार आहे. या सभेत ते या शहराचे संभाजीनगर असे नामांतर करणार अशा आश्वासनाचे गाजर सैनिक दाखवू लागले आहेत. मुळात मुख्यमंत्र्यांना असा निर्णय घेण्याच गेल्या अडीच वर्षात जमले नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पण त्याहून महत्वाचे म्हणजे, नामांतराचे गाजर दाखवून औरंगाबादच्या मुख्य समस्यांपासून नागरिकांचे लक्ष भावनिक मुद्द्यांवर वळविण्याचा नेहमीचाच पोरखेळ पुन्हा ते खेळतील अशी हवा तयार केली जात आहे" असं म्हटलं आहे.

"औरंगाबाद शहराला पाणीटंचाईची समस्या सतत भेडसावत आहे. केवळ बैठका घेऊन आणि कागदी आदेश देऊन हा प्रश्न सुटणार नाही. शहरातील रस्त्यांची दुर्दशा, औद्योगिक वसाहतीतील सुविधांचा अभाव, दहशत, खंडणीखोरी या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष वळवायचे आणि प्रत्यक्षात काहीच करायचे नाही ही ठाकरेंच्या कारभाराची तऱ्हा महाराष्ट्र अडीच वर्षांपासून अनुभवत आहे. त्यामुळे आजच्या सभेत केवळ गाजरे उधळण्यापलीकडे काहीही होणार नाही."

"ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतराची घोषणा करावी आणि त्याआधी पाणीटंचाईची समस्या तातडीने सोडवावी. उद्योगधंद्यांना सुरक्षिततेची हमी देऊन दादागिरी व दहशत माजविणाऱ्यांना वेसण घालून नागरिकांना सुखाने जगण्याचा मार्ग मोकळा करून दाखवावा. सभेत हात फैलावून घोषणाबाजी करून हे होणार नाही. त्यासाठी कृतीची गरज आहे आणि सरकारकडे नेमका त्याचाच अभाव आहे" असं देखील केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. 

Web Title: BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray And Shivsena Over Aurangabad rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.